Sharad Pawar : ‘मौलाना शरद पवारांचा आज जुम्मा होता’, पवारांनी दगडूशेठचं बाहेरुन दर्शन घेतल्यावरुन तुषार भोसलेंची खोचक टीका

भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पवारांवर जोरदार टीका केलीय. 'मौलाना शरद पवारांचा आज जुम्मा होता आणि त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्याचं कारण सांगून मंदिरात जायला नकार दिला', अशा शब्दात भोसले यांनी पवारांवर निशाणा साधलाय.

Sharad Pawar : 'मौलाना शरद पवारांचा आज जुम्मा होता', पवारांनी दगडूशेठचं बाहेरुन दर्शन घेतल्यावरुन तुषार भोसलेंची खोचक टीका
शरद पवारांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन, तुषार भोसले यांची टीकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 8:03 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. मात्र, पवारांनी मंदिरात जाणं टाळत बाहेरूनच गणपतीला हात जोडल्याचं पाहायला मिळालं. पवारांनी आज नॉनव्हेज खाल्ल्यामुळे त्यांनी मंदिरात जाणं टाळल्याचं राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं. पण याच मुद्द्यावरुन आता राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी पवारांच्या भूमिकेचं स्वागत केलंय. तर भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी पवारांवर जोरदार टीका केलीय. ‘मौलाना शरद पवारांचा आज जुम्मा होता आणि त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्याचं कारण सांगून मंदिरात जायला नकार दिला’, अशा शब्दात भोसले यांनी पवारांवर निशाणा साधलाय.

‘शरद पवारांना हे माहिती होतं की आपल्याला दगडूशेठ गणपतीला जायचं आहे. तरी सुद्धा त्यांनी नॉनव्हेज कसं खाल्लं? पण असं आहे ज्यांची हिंदूंच्या देव देवतांवर श्रद्धाच नाही, जे पूर्णपणे नास्तिक आहेत, देव धर्माला मानत नाहीत, जे मंदिरात जातीलच कसे. म्हणून मौलाना शरद पवारांचा आज जुम्मा होता आणि त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्याचं कारण सांगून मंदिरात जायला नकार दिला. हेच पवारसाहेब इफ्तार पार्ट्या झोडायला मोकळे असतात. ज्यांना आज दगडूशेठच्या मंदिरात जायला अॅलर्जी झालीय. काही बतावण्या केल्या तरी यातून पवारसाहेबांची सुटका होणार नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की पवारसाहेबांना हिंदू धर्माविषयी प्रचंड आकस आहे’, अशी टीका तुषार भोसले यांनी पवारांवर केलीय.

हे सुद्धा वाचा

गणपतीचं दर्शन, भिडे वाड्याचीही पाहणी

दरम्यान, शरद पवार यांनी आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. मात्र, त्यांनी मंदिरात जाणं टाळत बाहेरुनच गणपतीला हात जोडले. पवार यांनी नॉनव्हेज खाल्ल्यामुळे ते मंदिरात गेले नाहीत असं सांगण्यात आलं. त्याचवेळी पवार यांनी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली त्या भिडे वाड्याचीही पाहणी केली.

आनंद दवे यांच्याकडून पवारांच्या भूमिकेचं स्वागत

शरद पवारांनी आज गणपतीचं दर्शन घेतलं याचा आम्हाला आनंद आहे. राज ठाकरे यांनी जे आरोप केले होते त्याला आज पवारांनी कृतीतून उत्तर दिलं. मांसाहार केल्यानं पवार मंदिरात गेले नाहीत ही भाविकतेची सर्वोच्च पायरी आहे. त्यामुळे पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पवार यांनी यापूर्वीही सांगितलं होतं की मी प्रचारावेळी मंदिरात जातो. पण आज पवारांनी बाप्पाचं दर्शन घेतलं त्याचा आनंद असल्याचं दवे म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.