पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात! आता भाजप काय रणनिती आखणार?

पिंपरी-चिंचवड शहरावर वर्षानुवर्षे पवारांनी सत्ता गाजवली. मात्र, महापालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला अन् भाकरी फिरवली. आता भाजपच्या हातून ही सत्ता काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: रिंगणात उतरले आहेत.

पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात! आता भाजप काय रणनिती आखणार?
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 7:47 PM

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पिंपरी-चिंचवड शहराची ओळख होती. पिंपरी-चिंचवड शहरावर वर्षानुवर्षे पवारांनी सत्ता गाजवली. मात्र, महापालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला अन् भाकरी फिरवली. आता भाजपच्या हातून ही सत्ता काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: रिंगणात उतरले आहेत. 13 ऑक्टोबर रोजी शरद पवार माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 ऑक्टोबरला पवारांच्या उपस्थित मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. (Sharad Pawar will take over the reins of NCP for PCMC elections)

आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नावलौकिक आहे. हे देशातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा शरद पवारांचा राहिला आहे. पूर्वी हा लोकसभेचा बारामती मतदार संघाचा भाग होता. आपल्या निवडणूक प्रचाराचा नारळ पवार पिंपरी-चिंचवड मध्येच फोडायचे. पण 2017 च्या निवडणूकीत पिंपरी-चिंचवडकरांनी आपला कारभारी बदलला. अर्थात राष्ट्रवादीतल्या काही फुटीर नेत्यांमुळेच भाजपला पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवणं शक्य झालं.

जुने नेते शरद पवारांच्या भेटीला

शरद पवार देशाच्या राजकारणात सक्रिय झाल्यावर अजित पवार यांच्याकडे या शहराची सूत्र आली. अजित पवारांनीहीआपल्या कामाची छाप विकासकामांच्या माध्यमातून उमटवली. या काळात अनेक जुनेजाणते नाराज झाले. 2017 च्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपशी घरोबा केला. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. त्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांना दिलेल्या उमेदवारीवरुन अनेक जण नाराज झाले. अनेकांमध्ये आपल्याला डावल्याची भावना निर्माण झाली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यापैकीच काहीजणांनी आता शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसंच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरात लक्ष घालण्याच साकडं घातलं आहे. तशी माहिती माजी आमदार विलास लांडे यांनी दिलीय.

कोणत्या नेत्यांचं शरद पवारांना साकडं?

शरद पवारांची भेट घेणाऱ्यांमध्ये आझमभाई पानसरे, विलास लांडे, श्रीरंग शिंदे, शाम वाल्हेकर यांच्यासह विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचाही समावेश होता. शहरात पक्ष संघटना मजबूत करण्यात या सर्वांच मोठं योगदान असलं तरी सध्या त्यांच्यात नाराजीही आहे. काहींची नाराजी अजित पवारांच्या कार्य पध्दतीवर आहे. तर काहींना शहराचा कारभार पार्थ पवारांच्या हातात गेल्यावर आपलं काय? याचीही चिंता सतावत असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

शरद पवार कोणते डावपेच टाकणार?

मावळमधील पराभवानंतर आता पार्थ पवार यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहराची सूत्र जाण्याची चर्चा आहे. अशावेळी जुने नेते मात्र परत शरद पवारांकडे गेले आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटातटाच राजकारण समोर आलंय. दुसरीकडे महापालिका निवडणुकीसाठी 3 सदस्यीय प्रभाग झाल्यावर राष्ट्रवादीमधील अनेकांची झोप उडाली आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी अन गटातटाचं राजकारण मोडून काढण्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी पवार कोणता डाव टाकणार याकडे सत्ताधारी भाजपसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या :

फडणवीसांचा पाहणी दौरा आणि पंकजा मुंडे अचानक ‘अनवेल’, राजकीय चर्चेला तोंड फुटलं

जयंत पाटलांकडून फडणवीसांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पाठराखण! तज्ज्ञांच्या मतावर बोलणं टाळलं

Sharad Pawar will take over the reins of NCP for PCMC elections

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.