पत्राचाळ आरोप प्रकरणी शरद पवार यांचं विरोधकांना आव्हान, आरोप खोटे ठरल्यास…
शरद पवारांवर काल पत्राचाळ प्रकरणी आरोप केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आरोपांना उत्तर देत, विरोधकांना आव्हान देखील दिले आहे.
मुंबई : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी पत्रचाळ प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा. मात्र आरोप खोटे ठरल्यास काय करणार तेही स्पष्ट करा असं थेट आव्हानच शरद पवार यांनी सरकारला दिलं आहे. पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकर करा मात्र पराचा कावळा करू नका असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शदर पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये जोरदार फटकेबाजी केली आहे. पत्रचाळ प्रकरणावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा. पण पराचा कावळा करू नका असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पत्रचाळ प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आरोप खोटे ठरल्यास काय करणार तेही सरकारनं स्पष्ट करावं असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
यावेळी शरद पवार यांनी दसरा मेळाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. वाद वाढू नये याची जबाबदारी ही राज्याच्या प्रमुखाची असते असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत मविआला मोठं यश
दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात मविआला मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. मविआला एकूण 173 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला. तर भाजप आणि शिंदे गट यांना एकत्रित 210 जागांवर विजय मिळवता आला असं पवार यांनी म्हटलं आहे.
मात्र दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आम्हालाच सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.