शरद पवारांचं ‘या’ पक्षाला सत्तेत सहभागाचं आश्वासन
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये सहभागी करावं, असा प्रस्ताव राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे अण्णासाहेब कटारे यांनी शरद पवारांसमोर ठेवला होता.
मुंबई : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या प्रस्तावानंतर शरद पवारांनी पक्षाला सत्तेत सहभागी करुन देण्याचं आश्वासन (Sharad Pawar Mahavikas Aghadi) दिलं.
महाराष्ट्रात नुकतंच सत्तारुढ झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये सहभागी करावं, असा प्रस्ताव राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे अण्णासाहेब कटारे यांनी शरद पवारांसमोर ठेवला होता. त्यावर पवारांनी सकारात्मक उत्तर दर्शवलं.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहे. 2014 आणि 2019 मधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली, असं अण्णासाहेब कटारे यांनी सांगितलं.
अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय महासचिव पोपटराव सोनवणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष अशोकराव भोगले, नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे, मुंबई प्रदेश महासचिव सचिन नांगरे पाटील, नाशिकचे प्रशांत कटारे यांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची (Sharad Pawar Mahavikas Aghadi) भेट घेतली.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मागण्या कटारेंना शरद पवारांना भेटून सादर केल्या आणि चर्चा केली. त्यावेळी चर्चेत पवारांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला सत्तेत समावून घेण्याचं आश्वासन दिलं.
उद्धव ठाकरेंसोबत 25 मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली; खडसे म्हणतात…
काँग्रेससोबत आघाडीमध्ये लढलेल्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत 54 जागा जिंकल्या होत्या, मात्र लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ चारच जागा जिंकता आल्या होत्या.