शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शरद पवार मैदानात?; मुख्यमंत्री शिंदेंना दिला ‘हा’ सल्ला

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे येत्या 8 सप्टेंबर रोजी दिल्लीत शरद पवारांची भेट घेणार आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार पहिल्यांदाच शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत देशाच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शरद पवार मैदानात?; मुख्यमंत्री शिंदेंना दिला 'हा' सल्ला
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 2:20 PM

मुंबई: शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून (dussehra rally) शिवसेना (shiv sena) आणि शिंदे गट आमनेसामने उभा ठाकला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून दोन्हीकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेत असते. तरीही शिवसेनेला अजून शिवाजी पार्क मैदानात मेळावा घेण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता या वादात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी उडी घेतली आहे. पवार यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पवारांच्या या सल्ल्यामुळे ते शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून मैदानात उतरले असल्याची जौरदार चर्चा सुरू आहे.

शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना हा सल्ला दिला. मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांचा हा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानतात की मैदानासाठीचा आग्रह कायम ठेवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नितीश कुमार पवारांना भेटणार

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे येत्या 8 सप्टेंबर रोजी दिल्लीत शरद पवारांची भेट घेणार आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार पहिल्यांदाच शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत देशाच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. मोदी सरकारला टक्कर देण्यावर आणि देशात नवा पर्याय निर्माण करण्यावर या भेटीत अधिक भर दिला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे पवार आणि नितीश कुमार यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

वाद घालू नका

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे गट आणि शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावरून वाद न घालण्याचं आाहन केलं आहे. शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून मेळावे घेत आले आहेत. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावर मेळावे घेत आहेत. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचं नेतृत्व करतील असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावरून वाद घालू नये, असं अजित पवार म्हणाले. ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात. आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. वाद घालू नका. शिवाजी पार्क मैदानावरील सभा झाल्यानंतरच जनता कोणाच्या पाठीशी आहे हे कळेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.