Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटलांना मुख्यमंत्रिपदाची संधी आहे का? पत्रकाराच्या प्रश्नावर पवार हसत म्हणाले ‘उद्या मला वाटलं तर?’

"मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही" या पवारांच्या वक्तव्यात मोठा मेसेज दडल्याची चर्चा (Sharad Pawar on Jayant Patil Chief Minister)

जयंत पाटलांना मुख्यमंत्रिपदाची संधी आहे का? पत्रकाराच्या प्रश्नावर पवार हसत म्हणाले 'उद्या मला वाटलं तर?'
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 9:42 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्रिपदाची आस व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उत आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनाच जयंत पाटलांच्या स्वप्नाविषयी छेडलं असता, त्यांनीही लौकिकाला साजेशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ‘उद्या मला वाटलं तर काय करु?’ असा प्रतिप्रश्न करत शरद पवारांनी पत्रकारालाच गप्प केलं. (Sharad Pawar reacts on Jayant Patil wish to become Chief Minister)

“उद्या मला वाटलं तर काय करु?”

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, मराठा आरक्षण, महाविकास आघाडी सरकार, जयंत पाटील यासारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यास पत्रकाराने सुरुवात केली. त्यावर “मग काय झालं काय?” असा उलट प्रश्न पवारांनी विचारला. “काही संधी आहे का?” असं विचारत पत्रकाराने आपला प्रश्न पूर्ण केला. तेव्हा “उद्या मला वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही” अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली.

आठ शब्दात मोठा मेसेज

“मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही” या शरद पवारांच्या आठ शब्दांमध्ये मोठा मेसेज दडल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांना कोणी मुख्यमंत्री करणार नाही, असा सूचक इशारा शरद पवारांना द्यायचा असल्याची कुजबूज पत्रकार परिषदेनंतर रंगली होती.

जयंत पाटील काय म्हणाले?

दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे ते पद नाही. प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि खासदार शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं आपण म्हटल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये कार्यक्रमासाठी गेले असताना जयंत पाटील यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्रिपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

अजित पवारांचे मम

जयंत पाटलांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी छेडलं असता ते इतकंच म्हणाले की, “जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो.” (Sharad Pawar reacts on Jayant Patil wish to become Chief Minister)

सुप्रिया सुळे म्हणतात गैर काय?

“राजकीय जीवनात काम करत असताना इच्छा आकांक्षा असतात. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजितदादा बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला आहे. आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं… त्यात गैर काय?”, अशी खास प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

जयंतरावांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा खरंच शक्य…?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुमारे डझनभर नेते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे जयंत पाटील मुख्यमंत्री होती का? याबाबत राजकीय निरीक्षकांच्या मनात साशंकता आहे. राष्ट्रवादीत अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील या दिग्गजांपासून नुकतेच आलेले एकनाथ खडसेही आहेत. त्याचप्रमाणे अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांचे चेहरे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदात अनेक अडथळे असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.

पाहा संपूर्ण पत्रकार परिषद :

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न जयंत पाटलांचं, भाजपचा टोला रोहित पवारांना

जयंत पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्न ठरणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

(Sharad Pawar reacts on Jayant Patil wish to become Chief Minister)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.