अजित पवार यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावर शरद पवार यांनी दिले हे उत्तर, म्हणाले, इथं कोण उपस्थित…

अजित पवार पत्रकार परिषदेत दिसले नाही. अजित पवार यांच्या अनुपस्थिबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सगळे सहकारी आहेत. ..

अजित पवार यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावर शरद पवार यांनी दिले हे उत्तर, म्हणाले, इथं कोण उपस्थित...
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 6:39 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना येण्यास थोडा वेळ लागला. त्यामुळे पत्रकार परिषद थांबवण्यात आली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, रोहित पवार यासह अन्य नेते उपस्थित होते. परंतु, अजित पवार पत्रकार परिषदेत दिसले नाही. अजित पवार यांच्या अनुपस्थिबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सगळे सहकारी आहेत.

निर्णय मागे घेण्यासाठी आग्रह

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यांनी सांगितलं की, ठराव केला. मी माझा निर्णय मागे घ्यावा यासाठी आग्रह केला. तो निर्णय माझ्याकडे पोहचवण्याचे काम पक्षाचे अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी भावना स्पष्ट केल्या. पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते होते. कुणी आहे किंवा नाही, असा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही.

हे सुद्धा वाचा

अनेक राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध

देशात सर्व पक्षांच्या लोकांना एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये व्यक्तीशा माझे अनेक राजकीय नेत्यांशी सलोख्याशी संबंध आहेत. त्यामुळे या कामात लक्ष देण्यासाठी तुमची आवश्यकता आहे. असे अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मला सांगितलं. काँग्रेसचे राहुल गांधी यासारख्या नेत्यांनी लक्ष देण्यासाठी तुमची आवश्यकता आहे, असं सांगितल्याचं शरद पवार यांनी म्हंटलं.

सहकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही

निर्णय जाहीर करताना माझी नैतिक जबाबदारी होती की, सहकाऱ्यांना विश्वासात घेणं. सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं असतं तर मला सहमती दिली असती. पण, मी त्यांना विश्वासात घेतले नाही. ही गोष्ट नाकारता येत नाही. रिअॅक्शन येवढी तीव्र असेल, असं मला वाटलं नव्हतं. आमचे नेते हे राज्य, देश चालवू शकतात. राजकीय पक्षात उत्तराधिकारी ठरत नसतो, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

भाकरी फिरवायला घेणार होतो पण…

शरद पवार यांनी सांगितलं की, पक्षाचे सहकारी नेते ठरवितात. हा एका व्यक्तीचा निर्णय नसतो. सहकाऱ्यांशी चर्चा केली. नवीन सहकाऱ्यांना संधी दिली पाहिजे. जिल्हास्तरावर काम करणारे, राज्य पातळीवर काम करणारे यांना संधी दिली पाहिजे. संबंधितांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आम्ही हळूहळू करणार आहोत. भाकरी फिरवायला घेणार होतो. पण, भाकरी थांबली. असंही शरद पवार म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.