Anil Bonde : शरद पवार म्हणाले, नितीश कुमारांनी योग्यवेळी पाऊल उचललं, अनिल बोंडे म्हणतात, पवार यांना पलटी मारण्याची सवय
पवारांना नितीश कुमारांच्या रुपात काठी दिसली तर त्यांना आनंद होईलचं, अशी टीका खासदार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर केली.
अमरावती : बिहारमध्ये (Bihar) नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. त्यावर शरद पवार म्हणाले की, योग्यवेळी योग्य पाऊल उचललं. त्यावर खासदार (MP) अनिल बोंडे हसून म्हणाले, खरं जर पाहिलं, तर नितीश कुमार यांच्याबद्दल अनेक प्रतिक्रिया (reaction) आलेल्या आहेत. त्यावर पुन्हा प्रतिक्रिया देणं योग्य नाही. परंतु, पवार साहेबांना पलटी मारण्याची खूप सवय आहे. त्यामुळं नितीश कुमार यांनी घेतलेलं पाऊल योग्य वाटणं हे साहजिक आहे. बुडत्याला काठीचा आधार असतो. तसं नितीश कुमार हे काठी शोधताहेत. त्यामुळं पवारांना नितीश कुमारांच्या रुपात काठी दिसली तर त्यांना आनंद होईलचं, अशी टीका खासदार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर केली.
पाहा व्हिडीओ
बच्चू कडूंची नाराजी दूर होणार ?
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला आहे. यामध्ये शिंदे गटाच्या 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. भाजपच्या 9 आमदारांनी शपथ घेतली. एकूण 18 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, अनेक अपक्ष आमदार नाराज आहेत. बच्चू कडू तसेच रवी राणा यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती. परंतु, बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळं ते नाराज आहेत. यासंदर्भात खासदार अनिल बोंडे म्हणून मंत्रीपद मिळालं नसल्यानं दुःख वाटणं साहजिक आहे. सप्टेंबर किंवा पुढच्या काळात मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. त्यावेळी सर्व विभागांना, जिल्ह्यांना न्याय दिला जाईल. शिवसेना-भाजप सारासार विचार करून सर्वसमावेशक मंत्रिमंडळाचा विस्तार करेल. तसेच ते वेगानं काम करतील, अशी अपेक्षा आहे.
दुसऱ्या टप्प्यात कुणाची लागणार वर्णी
मंत्रीपदी कुणाला घ्यायचं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. ते दुसऱ्या टप्प्यात आणखी काही जणांना मंत्रीपदं देतील. त्यामुळं बच्चू कडू मंत्री होतील की नाही, हे मी सांगू शकत नाही. याचा सर्वस्वी निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं अनिल बोंडे म्हणाले. त्यामुळं मंत्रीमंडळाचा विस्तार केव्हा होतो. त्यावेळी कुणाकुणाली मंत्रिपदं मिळतील, हे सध्यातरी सांगणं कठीण आहे. मुख्यमंत्री कोणाकोणाची वर्णी मंत्रीपदी लावतात. कोणकोणाची नाराजी दूर करतात, हे नंतरच कळेल.