सरकार पाडण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न, पण सरकार 5 वर्षे टिकणार : शरद पवार
सरकार पूर्ण 5 वर्षे टिकणार असून यात कुठलीही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. (Sharad Pawar maha vikas aghadi)
कोल्हापूर : राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नासल्याचा दावा भाजपकडून सातत्याने केला जातो. मात्र, हे सरकार पूर्ण 5 वर्षे टिकणार असून यात कुठलीही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना भाजकडून हे सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला. (Sharad Pawar said that the maha vikas aghadi government will complete its 5 year tenure)
सरकार पाडण्यासाठी दिल्ली, मुंबईपासून प्रयत्न
कोल्हापुरात आल्यानंतर शरद पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न होतोय का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, “सरकार पाडण्याचे प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहेत. हा प्रकार विरोधकांकडून अखंडपणे सुरु आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण 5 वर्षे टिकेल,” असे शरद पवार म्हणाले. तसेच, हे सरकार पाडण्याचा प्रयत्न दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत होत असला तरी त्यांच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग होणार नसल्याचा विश्वासही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.
रेणू शर्मांच्या बाबतीत आमचा निर्णय योग्य होता
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले बलात्काराचे आरोप पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी मागे घेतल्यानंतर त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रेणू शर्मांनी केस परत घेतली असल्याचं समजलं. आम्हाला प्रथमदर्शनी सत्यता पडताळण्याची गरज वाटते. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असं मी आधीच म्हटलो होतो. आमचा निर्णय बरोबर होता असं मला आता वाटतंय,” असं शरद पवार म्हणाले.
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोत्तम वकील
यावेळी मराठा आरक्षणाच्या वैधतेवर बोलताना आरक्षण टिकण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. हा खटला लढवण्यासाठी सरकारकडून सर्वेत्तम वकिलांची नियुक्ती केली आहे. येत्या 25 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यात अधिक काही बोलता येत नाही. पण सरकार आरक्षण टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं पवार म्हणाले.
धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता, शरद पवारांची पहिली प्रतिक्रियाhttps://t.co/VOBhNMX8Y0@PawarSpeaks @dhananjay_munde #SharadPawar #DhananjayMunde #maharashtra #Politics
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 22, 2021
संबंधित बातम्या :
जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, त्यात गैर काय?, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया