अनिल देशमुख यांना शरद पवारांचा खंबीर पाठिंबा, 5 मोठे मुद्दे

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh letter) यांच्या पत्राची चिरफाड करताना, शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांना शरद पवारांचा खंबीर पाठिंबा, 5 मोठे मुद्दे
Sharad Pawar_Anil Deshmukh
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 1:44 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसत आहे. कारण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh letter) यांच्या पत्राची चिरफाड करताना, शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी परमबीर सिंगांच्या पत्राचा दाखला दिला. पवार म्हणाले, ज्या कालावधीचा उल्लेख करुन परमबीर सिंगांनी भेटीचा उल्लेख केला, त्या कालावधीत अनिल देशमुख हे कोरोनावरील उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे परमबीर सिंगांच्या आरोपात काही तथ्य नाही असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत भाष्य केलं. (Sharad Pawar shields HM Anil Deshmukh, said no need to resignation in Parambir Singh letter case)

परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला.

शरद पवारांचे पाच मुद्दे

१) परमबीर सिंग यांचे आरोप खोटे, अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही

सिंग यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही

२) परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वाझेंना बोलवले होते असे पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर गृहमंत्री मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले असे लिहिलंय. मात्र आमची भेट मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात झाली होती, असं सांगतानाच परमबीर सिंग हे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गप्प का होते? ते आरोपासाठी महिनाभर का थांबले?

३) अनिल देशमुख यांची चौकशी करणार का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर पवारांनी थेट यूटर्न घेतला. आता आलेल्या कागदपत्रावरून देशमुख हे मुंबईत नव्हतेच. ते नागपूरला होते आणि कोरोनावर उपचार घेत होते. त्यामुळे सिंग यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे चौकशीचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले.

४) महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, परमबीर सिंग यांनी जे जे मेन्शन केलं आहे, वाझेप्रकरणात, त्याबद्दल माझं म्हणणं आहे, मुख्य केस कोणती आहे? अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी पार्क करण्याची आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुख्य केस काय आहे तर संबधीत गोष्टी अंबनीच्या घराखाली गाडीत कशा आल्या, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे.

५) काल एटीएसने दोघांना अटक केली आहे. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात ही अटक झाली आहे. यावरुन एक स्पष्ट होत आहे, हिरेन यांची हत्या का झाली, त्यांची हत्या करणारे जे पोलीस वाटतात, त्यांना एटीएसने अटक केली. आता तपास सत्य बाहेर येईल. उद्या-परवा कधी येईल माहिती नाही. मात्र मला आनंद आहे, मुख्य केस जे सीपींच्या आरोपानंतर दुर्लक्षित होत होती, अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांची, त्याबाबत चौकशी होत आहे.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

संबंधित बातम्या  

मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल, राजधानीत शरद पवारांचा हुंकार

वाझे-देशमुख यांची भेट झाल्याचा दावा चुकीचा; शरद पवारांनी केली परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड

(Sharad Pawar shields HM Anil Deshmukh, said no need to resignation in Parambir Singh letter)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.