सहा वर्षे सत्तेत असूनही चुका दुरुस्त करता आल्या नाहीत का? शरद पवारांचा मोदी सरकारला सवाल
केंद्र सरकारमध्ये 6 वर्षे सत्तेत असताना देखील चुका दुरुस्त करता येत नसेल त्यावर चर्चा काय करायची, असा सवाल शरद पवार यांनी केला. Sharad Pawar slams Narendra Modi
पुणे: केंद्र सरकारमध्ये सहा वर्षे सत्तेत असताना देखील चुका दुरुरत करता येत नसेल त्यावर चर्चा काय करायची, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल याच्या दरात सुरु असलेल्या वाढीवरुन त्यांनी मोदी सरकारला टोला लगावला. (Sharad Pawar slams Narendra Modi Government over Petrol Diesel Price Hike)
मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर
केंद्र सरकार मध्ये सहा वर्षे सत्तेत असताना देखील चुका दुरुस्त करता येत नसेल त्यावर चर्चा काय करायची, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचं त्यावेळचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. त्याविषयी विचारले असता असता शरद पवार पवार यांनी मोदी सरकारला टोला लगावला. केंद्रात गेली सहा वर्ष यांचे सरकार आहे. आमच्याकडून चुका झाल्या तर त्या सहा वर्षात दुरुस्त करता आल्या नाहीत का? असा सवाल पवारांनी केलाय
प्रियांका गांधीकडूनही मोदी सरकारवर निशाणा
वाढत्या इंधन दरवाढीवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ज्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार नाहीत. तो दिवस अच्छा दिन म्हणून घोषित करा, अशी खोचक टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरून वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आठवडाभरात ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाही त्या दिवसाला भाजप सरकारने अच्छा दिन म्हणून जाहीर केलं पाहिजे, अशी मागणी केली.
वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला प्रत्येक दिवस हा महंगे दिनच आहे, अशी खोचक टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधी यांनी या पोस्ट सोबत नवी दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे भावही दिले आहेत. हे दर कालचे आहेत. तसेच इंधन दरवाढीचा हा अकरावा दिवस असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक
देशातील पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो तुम्ही पाहिला असेल. केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेची ती जाहिरात आहे. त्यावरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. ‘प्रत्येक पेट्रोल पंपावर पंतप्रधान मोदींचा फोटो आहे. त्या फोटोमध्ये ते आधी हसायचे. मग मास्क घातला. आता वाटतं की त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधावी. कारण त्यांना ही लूट दिसत नाही’, अशा शब्दात सावंत यांनी इंधन दरवाढीवरुन मोदींना टोला लगावला आहे.
तेव्हा तो दिवस ‘अच्छा दिन’ म्हणून जाहीर करा; प्रियांका गांधींची मोदी सरकारवर खोचक टीकाhttps://t.co/ZUhcxZTpSf#FuelPriceHike | #PriyankaGandhiVadra | #Congress | #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 20, 2021
संबंधित बातम्या
Petrol Diesel Price : आज मुंबईसह या शहरांमध्ये पुन्हा वाढले पेट्रोलचे भाव, वाचा आजचे दर
Petrol Diesel Price Today : शंभरी गाठूनही पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर
परभणीत देशातील सर्वात महाग इंधन, पेट्रोल 98 रुपयांच्या पार, वाहनचालक त्रस्त
(Sharad Pawar slams Narendra Modi Government over Petrol Diesel Price Hike)