‘एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू करायची अन् दुसरीकडे…’, शरद पवारांचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल

शरद पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते माणमध्ये बोलत होते.

'एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू करायची अन् दुसरीकडे...', शरद पवारांचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 9:37 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते माणमध्ये प्रचारसभेत बोलत होते. असं कोणतंही खातं नाही ज्यामध्ये मान तालुक्यातील अधिकारी नाही. सर्व क्षेत्रात या ठिकाणी अधिकारी आहेत. माण तालुक्यातील सर्व नेते एकत्रित आहे, हा संदेश या भागातील लोकांसाठी अत्यंत चांगला आहे. ही एकी अशीच पुढे ठेवायची आहे, असे जर सर्वजण एकत्र उभे राहिले तर या भागातील सर्व प्रश्न सुटतील आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, या भागातील अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. अलीकडच्या दिवसांमध्ये आम्ही एक संघटन केलं आहे, त्याचं नाव महाविकास आघाडी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

पुढे बोलताना ते म्हणाले की, आताचे पंतप्रधान 400 पारची घोषणा देत होते. याचा अर्थ जाणून घेतला. त्यांना एकतर संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेबांची घटना बदलायची असेल. यासाठीच चारशे पारचा नारा दिला जात होता. यासाठी आम्ही लोकसभेत निवडून आल्यानंतर एकत्र येऊन घटनेला धक्का लावायचा नाही यासाठी निर्णय घेतला.  आपल्या भागातील प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्या हातात अधिकार पाहिजेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांवर हल्लाबोल   

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही महिलांच्या समस्या सोडवू, काय सोडवल्या तर लाडकी बहीण योजना सुरू केली. एका बाजूला लाडक्या बहिणीचे कौतुक करायचे तर दुसऱ्या बाजुला महिलांवर अत्याचार होत आहेत आणि महाराष्ट्रातील महिला आणि मुली बेपत्ता देखील झाल्या आहेत. एका बाजुला लाडकी बहीण म्हणायचं दुसरीकडे संरक्षणाबाबत काही निर्णय घ्यायचा नाही. अशा सर्व गोष्टीवर एकत्र येऊन नियंत्रण आणण्याची गरज आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. नुसत्या एमआयडीसीने सर्व प्रश्न सुटत नाहीत, आपल्या सर्वांची साथ आवश्यकता आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.