Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलू, पवारांचे चंद्रकांतदादांना चिमटे, उत्तर फडणवीसांकडून

"ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू?" असे टोले शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावले (Sharad Pawar taunts Chandrakant Patil)

महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलू, पवारांचे चंद्रकांतदादांना चिमटे, उत्तर फडणवीसांकडून
शरद पवार चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 12:07 PM

मुंबई : ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टोला लगावला. त्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चंद्रकांतदादांची कड घेतली. आमचे नेते कुठूनही निवडून येऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. (Sharad Pawar taunts Chandrakant Patil Devendra Fadnavis answers)

“महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं”

चंद्रकांत पाटील यांच्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता, “महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं” असं म्हणत शरद पवार मिश्किल हसले. “ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू?” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

“आमचे नेते कुठूनही निवडून येतात”

“पवार साहेब काय म्हणाले माहिती नाही. सगळ्यांनाच गाव सोडून इकडे तिकडे कधी ना कधी जावं लागतं. पण चंद्रकांत पाटील आपल्या गावातून दुसऱ्या गावात गेले, तरी निवडून आले ना. ते राज्याचे नेते आहेत. आमचे राज्याचे नेते कुठूनही निवडून येऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे” असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. या प्रकरणातील तथ्य बाहेर काढलं पाहिजे. जे काही सत्य असेल बाहेर आणायला हवं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. (Sharad Pawar taunts Chandrakant Patil Devendra Fadnavis answers)

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुलं मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहिसा झाला पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी मग…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घेतली नसल्याचं दिसतं. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही, त्यांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही. त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लीप्स नीट ऐकाव्या यावरून कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल” असं देवेंद्र फडणवीस पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी म्हणाले.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्या म्हणजे कळेल की कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय: देवेंद्र फडणवीस

शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!

(Sharad Pawar taunts Chandrakant Patil Devendra Fadnavis answers)

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.