अंधेरी पोट निवडणुकीबाबत शरद पवार यांचे अत्यंत महत्वाचे वक्तव्य; निवडणुकीचा ट्विस्ट आणखी वाढला
दीड वर्षांच्या कालावधीसाठी राजकारण नको असे शरद पवार म्हणाले.
मुंबई : अंधेरी पोट निवडणुकीबाबत( Andheri by-election) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी देखील ही निवडणुक बिनविरोध व्हावी असे अवाहन केले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. ऋतुजा लटके यांच्या विरोधातील अर्ज मागे घ्यावा. अजूनही उमेदवार मागे घेण्यासाठी वेळ असल्याचेही शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. दीड वर्षांच्या कालावधीसाठी राजकारण नको असेही शरद पवार म्हणाले.
ही निवडणूक प्रतिष्ठेची करु नका. लटके यांच्या राजीनाम्याबाबत पालिकेने योग्य निर्णय घ्यायला हवा होता असंही शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून आणावे असे मी सर्वाना आवाहन करतो असे शरद पवार म्हणाले.
अंधेरी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. ही निवडूनक ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहेत. भाजपा कडूनही उमेदवार निवडणूक लढत आहे. मात्र, ही निववडणुक बिनविरोध व्हावी असे शरद पवार म्हणाले.
जेव्हा मी एखादा निर्णय घेतो तेव्हा त्या मागे एक विचार असतो. आज रमेश लटके नाहीत म्हणून ही जागा निर्माण झालेय. यामुळे येथे कोणीही उमेदवार देऊ नये.
महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या निधना नंतर त्यांच्या परिवार मधून जर कोणी निवडणूक लढवायचा असेल तर आम्ही उमेदवार उभा करणार नाही अशी भूमिका घेतली होती. यामुळे बिनविरोध निवडणुक घेण्याची परंपरा बंद करु नये.
हा उमेदवार फक्त एक वर्ष राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर निवडणूक टाळता आली तर बरे होईल. असंच वाटत कि एका वर्षासाठी निवडणूक नको. कोल्हापूर आणि पंढरपूर वेळी कालावधी मोठा होता. आता कमी आहे. म्हणून निवडणूक नको. अजून अर्ज मागे घेण्यासाठी मुदत बाकी आहे असे म्हणत शरद पवारांनी भाजपला अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आहे.