शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

महाविकास आघाडी सरकार पडेल, असे दावे भाजप नेत्यांकडून सातत्याने सुरु आहेत. त्यातच आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने एक वक्तव्य करुन राजकीय खळबळ निर्माण केली आहे.

शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 3:00 PM

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार पडेल, असे दावे भाजप नेत्यांकडून सातत्याने सुरु आहेत. त्यातच आता भाजपच्या एका मोठ्या नेत्याने एक वक्तव्य करुन राजकीय खळबळ निर्माण केली आहे. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांनी आज राज्य सरकार आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे, असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला आहे. (Sharad Pawar wants to end Shivsena; BJP leader claims)

कर्डीले म्हणाले की, शरद पवार सांगतायत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर फिरु दिले जात नाही. त्याचवेळी ते स्वतः मात्र या वयात सर्वत्र फिरत आहेत. शिवसेना संपवणे हा त्यामागचा एकमेव हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येते. हे करत असताना राष्ट्रवादीला कशाप्रकारे ताकद मिळेल याचा प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरु आहे.

कर्डीले म्हणाले की, हे सरकार अपयशी ठरल्याचे मी बोलत नाही तर सर्वसामान्य जनता तसं म्हणते. हे सरकार कोरोनाला रोखण्यात साफ अपयशी ठरलं आहे. अनेक ठिकाणी रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. औषधेदेखील मिळत नाहीत. परंतु त्याच वेळी हॉस्पिटलची लाखो रुपयांची बिलं मात्र द्यावी लागतात. यावरुन स्पष्ट होतंय की, हे सरकार अपयशी ठरलं आहे.

दरम्यान मागील आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील दावा केला होता की, महाविकास आघाडी सरकार पडणार आहे. पाटील म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडणार आहे, आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही.

पाटील म्हणाले होते की, “गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु आहे की हे सरकार जाणार आहे. या चर्चेमध्ये कधीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमच्या कोणत्याही नेत्याने हे सरकार जाऊन तिथे आमचं सराक येणार असल्याचा दावा केलेला नाही. कारण हे सरकार जाण्यासाठी आम्ही कोणतेही प्रयत्न करत नाही. मात्र, उलट आम्ही म्हणतो की हे सरकार त्यांच्यातील अंतर्विरोधामुळं पडेल.

दरम्यान मागील आठवड्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील असेच वक्तव्य केले होते. फडणवीस म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडी सरकारचे जे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यानंतर आम्ही बघू. परंतु आम्हाला सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई नाही.

संबंधित बातम्या

सरकार पडेल या अपेक्षेत चंद्रकांत पाटील कपडे घालूनच तयार असतात : शरद पवार

दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला

घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेणाऱ्यांना काहीच कळणार नाही, प्रवीण दरेकरांचा टोला

(Sharad Pawar wants to end Shivsena; BJP leader claims)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.