Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : भुजबळांबरोबरचा एकच निवडून आला, शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना शरद पवारांनी आरसा दाखवला

मला आठवतं ज्यावेळी छगन भुजबळ शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले त्यावेळी त्यांच्यासोबत एकंदर 15 - 16 लोक होते. निवडणुका झाल्या, निवडणुकीत एक सोडला तर बाकी सगळ्यांचा पराभव झाला. हा महाराष्ट्रातील पुर्वीचा अनुभव आहे.

Sharad Pawar : भुजबळांबरोबरचा एकच निवडून आला, शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना शरद पवारांनी आरसा दाखवला
शरद पवार, एकनाथ शिंदेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 8:40 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण झालंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे 41 आणि अपक्षांसह एकूण 47 आमदार आहेत. शिंदे या सर्व आमदारांना घेऊन सध्या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. एकीकडे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांना बंड शमवण्यासाठी विनंती केली जातेय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. शिंदे यांचा नवा व्हिडीओ समोर आलाय. त्यात आमदारांना संबोधित करताना भाजपसोबत जाण्याबाबत शिंदे बोलत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारलं असता त्यांनी छगन भुजबळ यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांचा दाखला देत शिंदेंसोबत असलेल्या आमदारांना एकप्रकारे आरसाच दाखवला आहे.

शरद पवार यांना निधीवाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर होत असलेल्या आरोपाबाबत विचारलं. त्यावेळी या आरोपात काहीही तथ्य नाही. हे असत्यावर आधारित व्यक्तव्य आहे, असं पवार म्हणाले. तसंच एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला आहे. तो अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधी आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघातही त्याची प्रतिक्रिया येईल, म्हणून हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. मला आठवतं ज्यावेळी छगन भुजबळ शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले त्यावेळी त्यांच्यासोबत एकंदर 15 – 16 लोक होते. निवडणुका झाल्या, निवडणुकीत एक सोडला तर बाकी सगळ्यांचा पराभव झाला. हा महाराष्ट्रातील पुर्वीचा अनुभव आहे. ही स्थिती आता आसामला जे लोक गेलेले आहेत त्यांच्यासोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आपल्या मतदारांना काहीतरी सांगावं, काहीतरी निमित्त काढावं म्हणून निधी किंवा तत्सम विषय काढला आहे. त्याशिवाय यात काही तथ्य नाही, असा सूचक इशारा पवार यांनी दिलाय.

अजितदादा आणि शरद पवारांची परस्पर विरोधी भूमिका!

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता अजून तरी तसं दिसत नसल्याचं वक्तव्य केलं. अजित पवारांच्या या भूमिकेबाबत विचारलं असता शरद पवार यांची भूमिका वेगळीच असल्याचं दिसून आलं. शरद पवार म्हणाले की, अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून विधान केलं आहे. इथं प्रत्यक्ष लोक हलवणं आणि हे ऑपरेशन करणं यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. अजित पवारांना स्थानिक माहिती जरूर आहे. परंतु गुजरात आणि आसामची स्थिती आम्हाला अधिक माहीत आहे. मी एक उदाहरण सांगतो. शिंदेंची एक मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं म्हटलंय. माझ्याकडे देशातील सर्व पक्षाची यादी आहे. त्यात देशात राष्ट्रीय पक्ष कोण भाजप, मायावती, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, काँग्रेस, राष्ट्रवादी ही अधिकृत यादी आहे. आता तुम्हीच सांगा सीपीआय सीपीएम काँग्रेस राष्ट्रवादीचा यात हात आहे का? मग जे नाहीत त्याचा तुम्ही विचार केला तर आहेत कोण, हे सांगावं लागत नाही.

पवारांचा अप्रत्यक्षपणे भाजपवर आरोप

दुसरी गोष्ट म्हणजे सुरत आणि आसामला जी व्यवस्था करणारे लोक दिसले, ते अजित पवारांच्या परिचयाचे आहेत असं वाटत नाही. पण माझ्या परिचयाचे आहेत. उदा. सुरतला भाजपचे राज्य अध्यक्ष सी.आर. पाटील मराठी गृहस्थ आहेत. ते पार्लमेंटरी मेंबर आहे. त्यांचा सहभाग असेल तर अर्थ काय सांगायचा? आसाममध्ये राज्य सरकार व्यवस्था करण्यात अॅक्टिव्ह आहे. तिथलं राज्य भाजपच्या हातात आहे. त्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट होते. कोण आहे नाही हे सांगायची गरज नाही. नाव घेण्याची गरज नाही, असं सांगत शरद पवार यांनी शिंदेंच्या बंडामागे भाजप असल्याचा आरोप थेट नाव न घेता केलाय.

हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....