सचिन वाझे प्रकरणामुळे शरद पवार नाराज; दिल्लीहून तातडीने निघाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार

आता शरद पवार दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटतील. | Sharad Pawar CM Uddhav Thackeray

सचिन वाझे प्रकरणामुळे शरद पवार नाराज; दिल्लीहून तातडीने निघाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार
शरद पवार, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 12:31 PM

मुंबई: हिरेन मनसुख प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि एकंदरच याप्रकरणाच्या हाताळणीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) प्रचंड नाराज असल्याचे समजते. त्यासाठी शरद पवार बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भेट घेणार आहेत. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर आता शरद पवार दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटतील. या भेटीदरम्यान मनसुख हिरेन प्रकरण आणि त्यामधील सचिन वाझे यांचा कथित सहभाग या दोन गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. (Sharad Pawar and CM Uddhav Thackeray will meet today in Mumbai)

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकारकडून हे संपूर्ण प्रकरण ज्या ढिसाळपणे हाताळले गेले आहे त्यामुळे शरद पवार प्रचंड व्यथित झाले आहेत. शिवसेनेशी संबंधित असलेल्या सचिन वाझे यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेच्या आग्रहामुळेच सचिन वाझे यांना पोलीस दलाच्या सेवेत पुन्हा सामावून घेण्यात आले होते. मात्र, आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणातील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभागृहात विरोधकांच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेला बसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही सभागृहात फिरकले नाहीत. या सगळ्यामुळे शरद पवार प्रचंड नाराज असल्याचे समजते. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ठाकरे सरकार पुन्हा बॅकफुटवर, वाझेंना क्राईम ब्रॅचमधून हटवलं

हिरेन मनुसख प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे (Sachin Waze) यांना गुन्हे शाखेतून (Crime Branch) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही सचिन वझे यांना हिरेन मनसुख प्रकरणाच्या तपासावरून आणि गुन्हे शाखेतून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

मनसुख हिरेन प्रकरणात विमल हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार तपास सुरु आहे. विरोधकांकडे काही पुरावे, सीडी किंवा सीडीआर असतील तर त्यांनी एटीएसकडे द्यावेत. एटीएस याबाबत कोणालाही पाठिशी घालणार नाही. सचिन वझे किंवा कोणाचाही जावई असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिले.

मात्र, अनिल देशमुख यांच्या या घोषणेनंतर भाजप आमदार प्रविण दरेकर आणि भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.

संबंधित बातम्या :

VIDEO: देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटीद्वारे करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

(Sharad Pawar and CM Uddhav Thackeray will meet today in Mumbai)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.