माढ्यातून शरद पवार जवळपास निश्चित!

मुंबई: निवडणूक न लढवण्याची घोषणा केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शरद पवार सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. माढ्यातल्या उमेदवारीवरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादावादी सुरु आहे. या वादावर शरद पवारांच्या नावाने तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. सध्या माढा […]

माढ्यातून शरद पवार जवळपास निश्चित!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई: निवडणूक न लढवण्याची घोषणा केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शरद पवार सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. माढ्यातल्या उमेदवारीवरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादावादी सुरु आहे. या वादावर शरद पवारांच्या नावाने तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे.

सध्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील प्रतिनिधीत्व करतात. मात्र स्वत: विजयसिंह मोहिते पाटील यांनीच शरद पवारांना माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आग्रह धरला आहे. शरद पवार यांनीच काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती. तेव्हापूसन  शरद पवार हे लोकसभा निवडणूक 2019 लढवणार की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. स्वत: शरद पवार यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. मात्र शरद पवार यांनी पुण्यात केलेलं वक्तव्य संभ्रमात टाकणारं होतं.

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनी केली. माझी इच्छा नाही, पण विचार करु” असं शरद पवार म्हणाले होते.

मुंबईत आज बैठक

सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद संपवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत आज (13 फेब्रुवारी) संध्याकाळी बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला राष्ट्रवादीचे माढ्यातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, प्रभाकर देशमुख आणि बबन शिंदे उपस्थित राहणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्याआधीच माढ्यातील राष्ट्रवादीचे अंतर्गत वाद मिटवण्याची धडपड पक्षाच्या वरिष्ठांकडून केली जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.

संबंधित बातम्या :

माढ्यातून शरद पवार उतरल्यास काय होईल?

लोकसभा लढण्याबाबत दोन दिवसात निर्णय, शरद पवारांची घोषणा

शरद पवार माढा लोकसभा निवडणूक लढवणार?  

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.