Sharad Pawar’s Prediction: राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यास बंडखोरांचेच नुकसान, शरद पवारांनी काय दिले संकेत?

लोक घेऊन जायला गुजरात आणि आसाम निवडलं. या दोन्ही राज्यात भाजपचं सरकार आहे. यात भाजप कुठपर्यंत आहे मला माहिती नाही अस शरद पवार म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीत आलोय. महाराष्ट्रातील स्थिती कशी सुधारू शकते, यासाठी आम्ही विचार करतच आहोत असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वाटत नाही, पण लागली तर निवडणुका होतील असं पवार म्हणाले.

Sharad Pawar's Prediction: राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यास बंडखोरांचेच नुकसान, शरद पवारांनी काय दिले संकेत?
राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वाटत नाही, पण लागली तर निवडणुका होतीलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 7:51 PM

मुंबई : एकनाथ शिंदेच्या(Eknath shinde) बंडखोरी नंतर राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. आतापर्यंत 40 पेक्षा अधिक आमदार गुवाहाटीतील(Guwahati) एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहेत. मात्र, या गट कायदेशीक पेचात सापडणार आहे. या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद(Sharad Pawar) पवार हे तातडीने दिल्लीत दाखल झाले. जाहीर पत्रकार परिषद घेत त्यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. गुवाहाटीत 50 पेक्षा अधिक आमदार त्यांच्या गटात सामील झालेत. त्यांच्या बोलण्यातून त्यांना सत्ता परिवर्तन पाहिजे असल्याचे शरद पवार म्हणाले. गेलेले लोक परत येतील असा विश्वास शिवसेनेला आहे. ते लोक परत आल्यावर त्यांच्या भूमिकेत बदल होईल. आमचा पूर्ण पाठिंबा शिवसेनेला असल्याचा पुर्नउच्चारही पवारांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या लोकांनी नव्या युतीबाबत चर्चा केली आहे. मात्र, आमच्या मित्रपक्षाचे नेते आम्हाला भेटले होते. या सरकारला आमचं पूर्ण पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितलं. आता आमचा त्यांना पाठिंबा आहे. आम्हाला तोच कायम ठेवायचा आहे असे पवार म्हणाले.

राष्ट्रपती राजवट लागल्यास त्यांच्याच मेहनतीवर पाणी फिरेल

राष्ट्रपती राजवटीची गोष्ट कोण बोलल हे मला माहिती नाही. मात्र या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागल्यास त्यांच्याच मेहनतीवर पाणी फिरेल. राष्ट्रपती राजवट लागल्याास पुन्हा निवडणुका लागतील. त्यांना काय आश्वासन दिले आम्हाला माहिती नाही.अडीच वर्षात राष्ट्रवादीमुळे त्यांना त्रास झाला नाही. आजच ही गोष्ट कशी बाहेर आली. हे फक्त सांगण्यासाठी असल्याचा आरोप पवारांनी केला.

भाजपचं सरकार आहे म्हणून आमदार घेवून जाण्यासाठी गुजरात आणि आसाम निवडलं

लोक घेऊन जायला गुजरात आणि आसाम निवडलं. या दोन्ही राज्यात भाजपचं सरकार आहे. यात भाजप कुठपर्यंत आहे मला माहिती नाही असेही पवार म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीत आलोय. महाराष्ट्रातील स्थिती कशी सुधारू शकते, यासाठी आम्ही विचार करतच आहोत असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वाटत नाही, पण लागली तर निवडणुका होतील असं पवार म्हणाले.

संख्याबळाचा दावा करताय तर परत या

त्यांच्याकडे संख्याबळ आहे तर मग ते तिकडे का बसले आहेत? याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. संख्याबळ आहे तर मुंबईत येऊन राज्यपालांकडे दावा का करत नाही?, असा सवाल शरद पवारांनी केला आहे. अडीच वर्ष ते आमच्यासोबत होते. राष्ट्रवादीसोबत होते. अडीच वर्षात राष्ट्रवादीचा त्रास झाला नाही. आता का झाला आहे? हे केवळ कारण आहे. स्वत:ला डिफेन्ड करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असंही पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.