Video | शिवाजी पार्क म्हणजेच शिवसेना, दसरा मेळाव्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य
शिवसेना आणि शिंदे गट दोघांनाही शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी बीएमसीने परवानगी दिलेली नाही. दरम्यान, शिंदे गटाने बीकेसीच्या एका ग्राऊंडवर मेळावा घेण्यास शिंदे गटाला परवानगी मिळाली आहे. मात्र अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी मिळालेली नाही.
मुंबईः शिवाजी पार्क (Shivaji Park) म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) नेतृत्वातील शिवसेना (Shivsena). त्यामुळे दसरा मेळावा घ्यायची शिवसेनेची परंपरा आहे. त्यात काही गैर नाही, यासाठी परवानगी दिली पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. ते पुढे म्हणाले, ‘ शिंदे साहेबांनाही मेळावा घेण्याचा अधिकार आहे. तेही घेऊ शकतात. पण त्यासाठी त्यांनी बीकेसीचं ग्राऊंड मागितलं. तेही सरकारने दिलं. मग दुसऱ्यांना त्यांनी विरोध करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देणं अपेक्षित आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिवसेनेनी घ्यायचा की शिंदे गटाच्या सदस्यांनी घ्यायचा, यावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि शिंदे गट दोघांनाही शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी बीएमसीने परवानगी दिलेली नाही. दरम्यान, शिंदे गटाने बीकेसीच्या एका ग्राऊंडवर मेळावा घेण्यास शिंदे गटाला परवानगी मिळाली आहे. मात्र अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी मिळालेली नाही.