MLA In Guwahati: गुवाहाटीत जाऊन बरेच दिवस झाले, माहित नाही तिथे असं काय आहे की आमदार तिकडं जातायेत; काय म्हणाले शरद पवार?

एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिवसभर सुरतमध्ये होते. त्यानंतर ते सुरतहून आसामच्या दिशेने निघाले. यांनतर त्यांच्या विमानाने गुवाहाटीमध्ये थांबा घेतला. यानंतर गुवाहाटीतून आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले. आतापर्यंत 40 पेक्षा अधिक आमदार गुवाहाटीतील एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहे. आमदारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत एकनाथ शिंदे सातत्याने शक्ती प्रदर्शन करत आहेत.

MLA In Guwahati: गुवाहाटीत जाऊन बरेच दिवस झाले, माहित नाही तिथे असं काय आहे की आमदार तिकडं जातायेत; काय म्हणाले शरद पवार?
खा. शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 6:37 PM

मुंबई : एकनाथ शिंदेच्या(Eknath shinde) बंडखोरी प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर येत आहेत. रॅली, बैठका अशा विविध माध्यमातून शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरु असताना राष्ट्रवादी पक्ष उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद(Sharad Pawar) पवार हे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. गुवाहाटीत जाऊन बरेच दिवस झाले, माहित नाही तिथे असं काय आहे की आमदार तिकडं जातायेत? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवार यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली(Guwahati).

एकनाथ शिंदेचे गुवाहाटीत शक्तीप्रदर्शन

एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिवसभर सुरतमध्ये होते. त्यानंतर ते सुरतहून आसामच्या दिशेने निघाले. यांनतर त्यांच्या विमानाने गुवाहाटीमध्ये थांबा घेतला. यानंतर गुवाहाटीतून आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले. आतापर्यंत 40 पेक्षा अधिक आमदार गुवाहाटीतील एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहे. आमदारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत एकनाथ शिंदे सातत्याने शक्ती प्रदर्शन करत आहेत.

राष्ट्रवादीचा शिवसेनेा पूर्ण पाठिंबा

शिवसेनाचा एक गट आसामला गेला आहे. त्यांच्या बोलण्यातून कळतं की त्यांना सत्ता परिवर्तन हेवंय. शिवसेनेला हा विश्वास आहे की गेलेले लोक परत आल्यावर त्यांच्या भूमिकेत बदल होईल. आमचा पूर्ण पाठिंबा शिवसेनेला आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या लोकांनी नव्या युतीबाबत चर्चा केली आहे. मात्र आमच्या मित्रपक्षाचे नेते आम्हाला भेटले होते. या सरकारला आमचं पूर्ण पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितलं. आता आमचा त्यांना पाठिंबा आहे .आम्हाला तोच कायम ठेवायचा आहे. राष्ट्रपती राजवटीची गोष्ट कोण बोलल हे मला माहिती नाही. मात्र या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागल्यास त्यांच्याच मेहनतीवर पाणी फिरेल. राष्ट्रपती राजवट लागल्याास पुन्हा निवडणुका लागतील. त्यांना काय आश्वासन दिले आम्हाला माहिती नाही.

अडीच वर्षात त्यांना राष्ट्रवादीमुळे त्यांना त्रास झाला नाही. आजच ही गोष्ट कशी बाहेर आली. हे फक्त सांगण्यासाठी आहे. लोक घेऊन जायला गुजरात आणि आसाम निवडलं. या दोन्ही राज्यात भाजपचं सरकार आहे. यात भाजप कुठपर्यंत आहे मला माहिती नाही.

राज्यातील परिस्थितीबाबत याठिकाणी काही बैठका होणार नाहीत. या ठिकाणी येण्याचं कारण ही राष्ट्रपतीपदाची निवडणूका आहे. महाराष्ट्रातील स्थिती कशी सुधारू शकते, यासाठी आम्ही विचार करतच आहोत.

मंत्री उदय सामंत गुवाहाटीला पोहोचले

एकनाथ शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांची सख्या अजूनही वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या तीन, चार दिवसात ठाकरेंच्या सर्व बैठकांना उपस्थित असणारे मंत्री उदय सामंत हेही आज गुवाटीला पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं बळ आणखी वाढणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.