Aurangabad : आता शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये , औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांना काय देणार कानमंत्र?

| Updated on: Jul 10, 2022 | 11:47 AM

सत्तांतर झाल्यापासून जो तो पक्ष संघटनावर भर देत आहे. शिवाय आता नगरपरिषदेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुशंगाने रणनिती कशी असणार याबाबतही पदाधिकाऱ्यांशी संवाद होणे महत्वाचे आहे.

Aurangabad : आता शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये , औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांना काय देणार कानमंत्र?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
Follow us on

औरंगाबाद : (Eknath Shidne) शिंदे गट आणि भाजप वगळता शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील पक्ष संघटनेसाठी मैदनात उतरला आहे. राज्यात होत असलेल्या राजकीय नाट्यापासून काहीशी अलिप्त असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) शरद पवार हे देखील आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. यासाठी ते (Aurangabad) औरंगाबाद मध्ये रविवारी दाखल होत आहेत. सत्तांतरानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने याला विशेष महत्व आले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ते काय कानमंत्र देतात हे देखील महत्वाचे आहे. शिवसेनेतील बंडानंतर मनसेचे अमित ठाकरे हे देखील 17 जुलैपासून मराठावाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेचे काम करणार आहेत. त्यापूर्वीच शरद पवार हे औरंगाबादमध्ये दाखल होत आहेत. मराठवाड्याची राजधानी आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचे असलेल्या या शहरावर प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आता लक्ष केंद्रीत केले आहे.

आगोदर भेटी-गाठी आणि नंतर पत्रकार परिषद

रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे औरंगाबाद शहारात दाखल होणार आहेत. दिवसभर ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या अनुशंगाने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शिवाय राज्यातील सत्तांतरानंतर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्याच अनुशंगाने रविवारी दिवसभर ते गाठीभेटी घेणार आहेत. तर सायंकाळी 5 च्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. सध्या शिंदे गट आणि भाजप सत्ता स्थापना आणि मंत्रिमंडळाचा विस्तार यावरच लक्ष केंद्रीत करीत असताना इतर पक्षांकडून संघटनेवर लक्ष दिले जात आहे.

तीनही पक्षातील नेते ग्राउंडवर

सध्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा राज्यभर सुरु झाली आहे. या दरम्यान पक्षाला मजबूत करण्याबरोबरच तरुणांचे संघटन त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. दुसरीकडे मनसेचे अमित ठाकरे हे 17 जुलैपासून 8 दिवस मराठवाड्यात असणार आहे. आठ दिवसांमध्ये या विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये युवकांचे संघटन आणि पदाधिकाऱ्यांच्या ते बैठका घेणार आहेत. असे असतानाच राष्ट्रवादीचे शरद पवार रविवारपासून औरंगाबाद शहरात दाखल झाले आहे. सत्तेचे केंद्रस्थान हे मुंबई असले तरी पक्ष संघटनेसाठी आवश्यक त्या बाबी केल्या जात आहेत.

हे सुद्धा वाचा

सत्तांतरानंतर प्रथमच पवार औरंगाबादमध्ये

सत्तांतर झाल्यापासून जो तो पक्ष संघटनावर भर देत आहे. शिवाय आता नगरपरिषदेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुशंगाने रणनिती कशी असणार याबाबतही पदाधिकाऱ्यांशी संवाद होणे महत्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे औरंगाबादमध्ये दाखल होणार असून कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकेड सर्वांचे लक्ष लागले आहे.