शरद पवारांची माघार अगोदरपासूनच ठरली होती : अशोक चव्हाण
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचं त्यांनी जवळपास निश्चित केलं होतं. पण मावळमधून नातू पार्थला उमेदवारी द्यायची असल्याचं सांगत त्यांनी एकाच कुटुंबातून जास्त उमेदवार नको म्हणून माघार घेत असल्याचं सांगितलं. पवारांची माघार अगोदरच ठरलेली होती. कारण, त्यांचा अगोदरपासूनच निवडणूक न […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचं त्यांनी जवळपास निश्चित केलं होतं. पण मावळमधून नातू पार्थला उमेदवारी द्यायची असल्याचं सांगत त्यांनी एकाच कुटुंबातून जास्त उमेदवार नको म्हणून माघार घेत असल्याचं सांगितलं. पवारांची माघार अगोदरच ठरलेली होती. कारण, त्यांचा अगोदरपासूनच निवडणूक न लढण्याचा निर्णय होता, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांबाबत दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर टीव्ही 9 मराठीशी बोलताना अशोक चव्हाणांनी शरद पवारांचा निर्णय, तसेच बैठकीतील तपशीलाबाबत माहिती दिली.
काँग्रेस पक्षाच्या सीईसी (Central Election Committee) बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारीवर सकारात्मक चर्चा झाली. 12 नावांवर चर्चा झाली असून जवळपास 10 नावे निश्चित झाली आहेत. नगरमधील जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेस पक्षाकडे घेण्यावर विचार सुरु आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नाही, असा आरोप अशोक चव्हाणांनी केला. राजू शेट्टी यांच्याशी आमची चर्चा झाली असून त्यांची नाराजी लवकर दूर होईल, असं मतही अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं.
संबंधित बातम्या :