“सावरकर राहिले त्या जेलच्या खोली एक दिवस राहून दाखवा, मग मानलं!”, शरद पोंक्षे यांचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज

शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींना चॅलेंज दिलंय, पाहा...

सावरकर राहिले त्या जेलच्या खोली एक दिवस राहून दाखवा, मग मानलं!, शरद पोंक्षे यांचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 10:00 AM

मुंबई :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर भाष्य केलंय. सेल्युलर जेलमध्ये ज्या खोलीत सावरकर (Vinayak Savarkar) राहायचे त्या खोलीचा व्हीडिओ शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आपल्या फेसबुक पेजेवर शेअर केला आहे आणि राहुल गांधींना चॅलेंज दिलंय.

राहुल गांधींना चॅलेंज

शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हीडिओतून राहुल गांधींना चॅलेंज दिलंय. “हिंमत असेल तर सेल्युलर जेलमध्ये ये. या खोलीत एक दिवस राहून दाखव!, असं आव्हान पोंक्षे यांनी दिलंय.

“7 बाय 11 च्या या खोलीत सावरकर राहायचे. कैद्याचे कपडे, हातात आणि गळ्यात साखळदंड अशा आवस्थेत 11 वर्षे सावरकर राहिले. एवढी बडबड करण्यापेक्षा, बरळण्यापेक्षा इथे ये. 11 वर्षे सोड, 11 दिवसही सोड, फक्त 1 दिवस या खोलीत राहून दाखव. तुझ्या गळ्यात, हातात साखळदंड अडकवतो. अर्ध कच्चं मांस, घाणेरडा भात, महारोग्यांच्या हातचं अन्न. त्यातले किडे काढून तेच अन्न सावरकर खायचे तसं खा. त्यानंतर थोडा वेळ काथ्या कुटायला घेऊन जातो. हे सगळं करुन दाखव मग बडबड कर”, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींना सेल्युलर जेलमध्ये एक दिवस राहायचं चॅलेंज दिलंय.

शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या या व्हीडिओत त्यांनी सावरकर राहायचे ती सेल्युलर जेलमधील खोली दाखवली आहे. यात सावरकर कसे राहायचे? याचं त्यांनी वर्णन केलंय.

राहुल गांधी यांचं विधान काय?

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली आहे. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत असल्याचं राहुल गांधी म्हणालेत. त्यांच्या या विधानानंतर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधींच्या विधानाचं समर्थन करत नसल्याचं सांगितलं आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.