“चंद्रकांतदादा, विचारपूर्वक वक्तव्य करा, नाहीतर…” राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंचा पुन्हा हल्लाबोल
चंद्रकांत पाटील यांनी कोणतंही वक्तव्य विचारपूर्वक करायला हवं, अन्यथा राष्ट्रवादीही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.
नवी मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘बाप’ काढल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली. “तुम्ही इतरांचे बाप काढता, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?” असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विचारला. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं. (Shashikant Shinde warns Chandrakant Patil to think before commenting)
“चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी वक्तव्य करताना तारतम्य बाळगायला हवं होतं. हल्ली त्यांच्या वक्तव्यांमध्ये बेस नसतो. तुम्ही इतरांचे बाप काढणार, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का? कोणतंही वक्तव्य विचारपूर्वक करायला हवं, अन्यथा राष्ट्रवादीही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल” असा इशारा शशिकांत शिंदे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिला.
“खडसे राष्ट्रवादीत आल्यास महाराष्ट्राला फायदा”
“एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल आपल्याला माहिती नाही. पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो हिताचाच असेल. खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी गोपीनाथ मुंडेंसोबत पक्ष वाढवायला अहोरात्र मेहनत घेतली. पण त्याच पक्षात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल, तर साहजिकच कोणीही आपल्या कर्तृत्वाला संधी मिळण्यासाठी दुसरा निर्णय घेईल. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला असेल आणि त्याला शरद पवारांनी मान्यता दिली असेल, तर महाराष्ट्राला फायदा होईल” असा विश्वास शशिकांत शिंदेंनी व्यक्त केला.
“चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपा ची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे?” असे ट्वीट शशिकांत शिंदे यांनी केलं होतं. (Shashikant Shinde warns Chandrakant Patil to think before commenting)
चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपा ची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? (१/१) pic.twitter.com/8vNIqwFwys
— Shashikant Shinde (@shindespeaks) October 13, 2020
संबंधित बातम्या :
आधी चंद्रकांतदादांनी पवारांचा ‘बाप’ काढला; आता राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर
(Shashikant Shinde warns Chandrakant Patil to think before commenting)