शत्रुघ्न सिन्हांचा काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला, भाजपला सोडचिठ्ठी देणार!
नवी दिल्ली : बिहारमधील पाटणा साहिबचे खासदार आणि भाजप नेते, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 28 मार्च रोजी त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. भाजपने यावेळी तिकीट कापल्यानंतर त्यांनी भाजप सोडण्याचे संकेत दिले होते. काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हांच्या भाजप सोडणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलाय. शिवाय ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार […]
नवी दिल्ली : बिहारमधील पाटणा साहिबचे खासदार आणि भाजप नेते, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 28 मार्च रोजी त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. भाजपने यावेळी तिकीट कापल्यानंतर त्यांनी भाजप सोडण्याचे संकेत दिले होते. काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हांच्या भाजप सोडणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलाय. शिवाय ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.
पाटणा साहिबमधून शत्रुघ्न सिन्हा यांच्याऐवजी भाजपने विद्यमान मंत्री रवीशंकर प्रसाद यांना तिकीट दिलंय. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होते. भाजपने बिहारसाठी जारी केलेल्या यादीत शत्रुघ्न सिन्हांना तिकीट देण्यात आलेलं नाही. 2014 ला मोदी सरकार आल्यापासूनच शत्रुघ्न सिन्हांनी अनेकदा पक्षाविरोधातच जाहीर वक्तव्य केली होती. शिवाय ते विरोधकांच्या व्यासपीठावरही दिसले होते. राफेल व्यवहाराविषयी त्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
शुक्रवारीच शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या खास शैलीत ट्वीट करुन ते म्हणाले होते, “मोहब्बत करने वाले कम न होंगे, (शायद) तेरी महफिल में लेकिन हम न होंगे”. आणखी एका ट्वीटमध्ये ते मोदींना उद्देशून म्हणाले, “सर, देश तुमला सन्मान करतोय, पण नेतृत्वातील विश्वसार्हता आणि विश्वास कमी आहे. जो नेतृत्त्व करतोय आणि सांगतोय, त्याच्यावर लोकांना विश्वास आहे का? बहुतेक नाही. पण आता वेळ निघून गेली आहे.”