Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक, सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या डॉक्टर नातवाने म्हणजेच डॉ. अनिकेत देशमुख यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक, सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु
गणपतराव देशमुख
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 5:45 PM

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या डॉक्टर नातवाने म्हणजेच डॉ. अनिकेत देशमुख यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. सोलापूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. गणपतराव देशमुखांनी वयाची 96 वर्षे पूर्ण केली आहेत. एवढं वय असूनही ते आतापर्यंत मतदारसंघात फिरत होते, जनसामान्यांचे प्रश्न तडीस लावून नेते होते.

गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पित्ताशय खडे आहेत. त्यावरचं त्यांचं ऑपरेशन पार पडलंय. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे

कोण आहेत गणपतराव देशमुख?

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.

आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम केलं.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

(Shetkari Kamgar paksh Ganpatrao Deshmukh health is Critical)

हे ही वाचा :

1962 पासून आमदार, गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढवणार नाहीत

11 वेळा आमदार, 95 वर्षीय गणपतराव देशमुखांच्या भेटीला चंद्रकांत पाटील, कारण…

..याची माहिती CM यांना आहे का?, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांची टीका
..याची माहिती CM यांना आहे का?, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांची टीका.
गोऱ्हेंना अंधारेंची कायदेशीर नोटीस, ठाकरेंबद्दलचं 'ते' भाष्य करण भोवलं
गोऱ्हेंना अंधारेंची कायदेशीर नोटीस, ठाकरेंबद्दलचं 'ते' भाष्य करण भोवलं.
त्र्यंबकेश्वरमधील वादावर प्राजक्ता स्पष्ट म्हणाली, मनातले किंतू परंतू
त्र्यंबकेश्वरमधील वादावर प्राजक्ता स्पष्ट म्हणाली, मनातले किंतू परंतू.
देख तूनी बायको.. गाण्यावर थिरकले महसूलचे अधिकारी; वडेट्टीवारांचा संताप
देख तूनी बायको.. गाण्यावर थिरकले महसूलचे अधिकारी; वडेट्टीवारांचा संताप.
धंगेकर पक्षप्रवेशावर स्पष्टच म्हणाले, 'निर्णय घ्यायचा की नाही ते...'
धंगेकर पक्षप्रवेशावर स्पष्टच म्हणाले, 'निर्णय घ्यायचा की नाही ते...'.
'..माझ्यावर दबाव होता', कोल्हेंचा 'स्वराज्यरक्षक संभाजी'बाबत मोठा दावा
'..माझ्यावर दबाव होता', कोल्हेंचा 'स्वराज्यरक्षक संभाजी'बाबत मोठा दावा.
'पण ब्राम्हणांची औकात...', इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी
'पण ब्राम्हणांची औकात...', इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी.
गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर?आता पक्षाची भूमिका काय?
गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर?आता पक्षाची भूमिका काय?.
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?.
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र.