Ramdas Kadam : रामदास कदम यांनी स्पष्टच सांगितले; ‘भाजपात जाणार नाही…’
रामदास कदम यांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, 'मरेपर्यंत बाळासाहेबांचा झेंडा सोडणार नाही'
शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे वारंवार शिवसेनेचा सच्चा शिवसैनिक असल्याचे आपल्या भाषणातून सांगत असतात. दरम्यान, पुन्हा एकदा त्यांनी कायम शिवसेनेतच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आजही आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा खांद्यावर घेऊन आहोत आणि मरेपर्यंत हा भगवा झेंडा सोडणार नसल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.
यासह भापमध्ये रामदास कदम जाणार असल्याच्या चर्चांवर देखील त्यांनी पूर्णविराम दिला आहे. मरणार तर भगव्या झेंड्यातच, या भगव्याची कास आणि साथ कदापीही सोडणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे बोलत असताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले बाळासाहेबांच्या विचारांची उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केली. बाळासाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी संघर्ष करत शिवसेना मोठी केली, आणि त्याच शरद पवारांना जाऊन मिळाल्याची नाराजीही रामदास कदम यांनी व्यक्त केली.