मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घाडमोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचा गट आज राज्यपालांना (Bhagat Singh Koshyari) पत्र देणार असल्याची माहिती आहे. मविआ सरकारचा पाठिंबा काढण्यासंदर्भात हे पत्र असल्याच माहिती आहे. राज्यपालांना पत्र देण्याची शिंदे गटाची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. शिंदे गट हीच शिवसेना (Shivsena) असल्याचा दावा राज्यपालांकडे देणाऱ्या पत्रात केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे सरकार अल्पमतात असल्याचं एकप्रकारे राज्यपालांना शिंदे गटाकडून सांगितलं जाईल. यानंतर राज्यपाल महोदय महाविकास आघाडी सरकारला बहुमद सिद्ध करण्याच्या सूचना देऊ शकतात. यामुळे ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय. यामुळे सरकार अल्पमतात येण्याची देखील शक्यता आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे ‘tv9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले की, शिंदे गटाचं पत्र दिल्यानंतर राज्यपाल मुख्यंत्र्यांना पत्र देऊ शकतात, की तुमचं सरकार अल्पमतात आहे. त्यानुसार अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करावं लागले. आता कायदेशीर प्रक्रिया सुरु झाल्याचं दिसतंय, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी ‘tv9 मराठी’सोबत बोलताना दिली आहे. शिंदे गट हीच शिवसेना असल्याचं पत्र शिंदे गट राज्यपालांना देणार असल्यची माहिती आहे. शिवसेनेपासून शिंदे गटाचे आमदार दूर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची भिस्त विधानसभेचे अपाध्यक्ष झिरवळ यांच्यावर असून आता यावर पुढे काय होतं. ते पाहणं महत्वाचं होणार आहे.
खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे सोडल्यास बाकी सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी केलाय. यामुळे पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे.