Video : नावात बाळासाहेब, गाण्यात धर्मवीर…. शिंदे गटाची ढाल-तलवार घेऊन लढाई सुरु
शिंदे गटाने शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर केले आहे. यानंतर आता शिंदे गटाने आपला नवा टिझर जारी केला आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे गट शिंदे गट ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ढाल-तलवार चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटात जल्लोषाचे वातावरण पहायला मिळत आहे. शिंदे गटाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. शिंदे गटाने शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर केले आहे. यानंतर आता शिंदे गटाने आपला नवा टिझर जारी केला आहे. नावात बाळासाहेब, गाण्यात धर्मवीर असा हा टीझर आहे.
सात सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये शिंदे गटाच्या पक्षाचे नाविन नाव आणि चिन्ह दिसत आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये जे गाणं वापरण्यात आले आहे त्यात धर्मीवर आनंद दिघे यांचे नाव ऐकायला मिळत आहे.
शिंदे गटाचा टिझर
शिवरायांचा विचार,
हिंदुत्वाचा आधार,
दुर्जनांचा संहार,
शिवसेनेची ढाल-तलवार…
अस ट्विट करत कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गटाचा व्हिडिओ टिझर शेअर केला आहे.
शिवरायांचा विचार,
हिंदुत्वाचा आधार,
दुर्जनांचा संहार,
शिवसेनेची ढाल-तलवार…@mieknathshinde pic.twitter.com/qePGcQZHEK
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) October 11, 2022
शिंदे गटाचे पोस्टर
आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार…. सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी #ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू #तलवार…. #बाळासाहेबांची_शिवसेना निशाणी : #ढाल_तलवार असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे.
आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार….
सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी #ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू #तलवार….#बाळासाहेबांची_शिवसेना
निशाणी : #ढाल_तलवार pic.twitter.com/QsatzmPdCE
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 11, 2022
शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालं आहे. तर, शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.
सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले आहे. तर, ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे.