मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shiv Sena) उठाव केल्यानंतर सातत्याने शिंदे गटाकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक शहरात शिंदे गटाकडून नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येत आहे. याद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये दादा भुसे, अर्जुन खोतकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मात्र आमदार प्रताप सरनाईक यांना धक्का देण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांना युवासेनेत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे.
शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दादा भुसे, अर्जुन खोतकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. मात्र या यादीमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांच्या नावाचा समावेश नाहीये. हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.
दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. भूखंड हडपल्याचा आरोप करत ठाणेकरांच्या वतीने प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तीन ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दफनभूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडपल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.