Eknath Shinde : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशीव’, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव; शिंदे-फडणवीस सरकारचे नामांतरावर शिक्कामोर्तब

राज्याच्या अनुशंगाने महत्वाच्या असलेल्या निर्णयावर आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्यानंतर औरंगाबादचे 'संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामांतरण करण्यात आले आहे तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्याचा निर्णय झाला.

Eknath Shinde : औरंगाबादचे 'संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशीव', नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव; शिंदे-फडणवीस सरकारचे नामांतरावर शिक्कामोर्तब
मुख्यमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 12:32 PM

मुंबई :  (MVA) महाविकास आघाडी सरकारने अल्प मतात असतानाही घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत (State Government) शिंदे सरकारने तीन महत्वाचे निर्णय पुन्हा नव्याने घेतले आहेत. 29 जून रोजी झालेले निर्णय हे घटनाबाह्य आणि घाईगडबडीत घेण्यात आले होते. त्यामुळे लोकशाहीला ते मान्य नव्हते. आता पुन्हा (Cabinet Meeting) मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने तीन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतरण करण्यात आले आहे तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यात आले आहे. दि. बा. पाटील यांच्या भूमिपुत्रांसाठीचे योगदान पाहून हे नाव देण्यात आल्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे निर्णय जरी महाविकास आघाडी सरकारच्या काळातले असले तरी त्याची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. लोकशाहीत बहुमताला मोठे महत्व आहे. आणि आता आमच्याकडे पूर्ण बहुमत असल्याने या निर्णयावरच शिक्कामोर्तब झाल्याती घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

विधान सभेत ठरावानंतर केंद्राकडे प्रस्ताव

राज्याच्या अनुशंगाने महत्वाच्या असलेल्या निर्णयावर आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्यानंतर औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतरण करण्यात आले आहे तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्याचा निर्णय झाला. आता हा ठराव विधानसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्राकडे पाठविला जाणार आहे. शिवाय याला मंजूरी मिळणार असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

बहुमताला महत्व, महाविकास आघाडीवर टोलेबाजी

लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. शिवाय 29 जून रोजी महाविकास आघाडी सरकारने हे सर्व निर्णय घाई गडबडीत आणि बहुमत नसताना घेतले होते. त्यामुळे हे घटनाबाह्य होते. आता या निर्णयाला 165 आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे आता घेतलेले निर्णय हेच घटनेला धरुन असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी यापूर्वी असे निर्णय घेतले असल्याचा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला.

उगवत्या सूर्याच्या साक्षीने निर्णय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर बोचरी टिका केली. मावळत्या सरकारने हे निर्णय तर घेतले पण ते सर्व घटनाबाह्य होते. केवळ जबाबदारी झटकून द्यायची म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला होता. पण आता उगवत्या सूर्याच्या साक्षीने तयार झालेल्या सरकारचे निर्णय आहेत. त्यामुळे घेतलेले निर्णय लवकरच अस्तित्वातही येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.