“मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी मोदी सरकारची; फडणवीसांनी भूलथापा देऊन फसवणूक केली”

| Updated on: Nov 27, 2020 | 4:08 PM

श्रीमंत कोकाटे यांनी देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाबाबत भूलथापा देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. Shirmant Kokate Devendra Fadnavis

मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी मोदी सरकारची; फडणवीसांनी भूलथापा देऊन फसवणूक केली
Follow us on

सांगली: इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाबाबत भूलथापा देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून श्रीमंत कोकाटे निवडणूक लढवत आहेत. श्रीमंत कोकाटे पदवीधर निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी सांगलीत असून मराठा आरक्षणासाठी केंद्रानं प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. (Shirmant Kokate accused Devendra Fadnavis cheating with Maratha community on reservation)

मराठा आरक्षणाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी फसवणूक केली आहे. फडणवीस सरकारनं गायकवाड आयोग नेमला होता. मात्र, केंद्र सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची परवानगी काढून घेतली. मोदी सरकारने नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस या आयोगाचा अहवाल ग्राह्य धरला जातोय. मग, देवेंद्र फडणवीसांनी जो आयोग नेमला तो बेकायदेशीर होता, असा आरोप श्रीमंत कोकाटे यांनी केला.

मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्रातील मोदी सरकारची आहे. मोदी सरकारला खरच आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी कायदा करावा. केंद्राला मराठा आरक्षणाला परवानगी द्यायची नसेल तर त्यांनी राज्याला स्वायत्तता द्यावी. आरक्षणाची मर्यादा 50 टक्केच्या पुढे नेता येत नाही, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाची असेल तर केंद्रानं कायदा करुन आरक्षणाची मर्यादा वाढवावी. (Shirmant Kokate accused Devendra Fadnavis cheating with Maratha community on reservation)

अन्यथा राज्य सरकारला स्वायत्तता द्यावी

मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्रातील मोदी सरकारची आहे. आरक्षण मर्यादा ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढवली पाहिजे. केंद्राला मराठा आरक्षणाला परवानगी द्यायची नसेल तर त्यांनी राज्याला स्वायत्तता द्यावी, अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पदवीधरांच्या हक्कांची आहे. या मतदारसंघात अरुण लाड आणि संग्राम देशमुख  साखर कारखानदारांना उमेदवारी देण्यात आलीय. ज्या साखर कारखानदारांचा पदवीधरांशी काही संबंध नाही त्यांना पदवीधरांच्या समस्या समजत नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे त्या दोन उमेदवारांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची फसवणूक केली, असल्याचा आरोप श्रीमंत कोकांटेनी केला.

अजित पवारांचा जुन्या पेन्शनला विरोध आहे. पदवीधर कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी जुनी पेन्शन आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पदवीधरांचे प्रश्न सोडू शकत नाहीत. पदवीधरांचे प्रश्न नसणाऱ्या उमेदवारांचा पराभव करण्याचे आवाहन श्रीमंत कोकाटेंनी केले आहे. (Shirmant Kokate accused Devendra Fadnavis cheating with Maratha community on reservation)

पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार

अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
संग्राम देशमुख (भाजप)
रुपाली पाटील ( मनसे )
शरद पाटील ( जनता दल )
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)

पुणे पदवीधर मतदारसंघ 2014 निकाल
उमेदवार                               मते
चंद्रकांत पाटील (विजयी)      61,453
सारंग पाटील                    59,073
अरुण लाड                       37189
शैला गोडसे                      10,594
शरद पाटील                     8,519


संबंधित बातम्या 

काटा मारणाऱ्या साखरसम्राटांचा जनता काटा काढणार, श्रीमंत कोकाटेंचा मविआ, भाजप उमेदवारांवर हल्लाबोल

भाजप, महाविकास आघाडी, मनसेच्या उमेदवारांविरोधात तक्रार, निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा आरोप

(Shirmant Kokate accused Devendra Fadnavis cheating with Maratha community on reservation)