Shirur Lok sabha result 2019 : शिरुर लोकसभा मतदारसंघ निकाल
शिरुर लोकसभा मतदारसंघ : शिरुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाआघाडीकडून नव्याने राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले अभिनेता डॉ.अमोल कोल्हे यांनी बाजी मारली. शिरुर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.46 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 1 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळत आहे. या […]
शिरुर लोकसभा मतदारसंघ : शिरुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाआघाडीकडून नव्याने राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले अभिनेता डॉ.अमोल कोल्हे यांनी बाजी मारली. शिरुर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.46 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 1 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात शिवसेने-भाजप युतीकडून शिवाजी आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस महाआघाडीकडून नव्याने राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले अभिनेता डॉ.अमोल कोल्हे आणि बहुजन वंचित आघाडीकडून राहुल ओव्हळ यांच्यात लढत झाली.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | शिवाजीराव आढळराव-पाटील (शिवसेना) | पराभूत |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) | विजयी |
अपक्ष/इतर | पराभूत |
राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक महाराष्ट्रातील राजकीयदृष्या रंगतदार लढत म्हणून शिरुर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जाते. एकीकडे सलग तीन वेळा शिरुर लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील हे आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेतून नव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले स्वराज्य रक्षक संभाजी या टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले डॉ.अमोल कोल्हे आहेत. या दोघांमध्ये थेट लढत होत आहे.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून घरघरात पोहोचलेले डॉ अमोल कोल्हे यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील प्रमुख लढत म्हणून शिरुरच्या लढतीकडे पाहिले जात आहे.
मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत शिरुर लोकसभा मतदारसंघात एक टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटली.
2014 विधानसभानिहाय मतदान आकडेवारी
- जुन्नर-1,80,990
- आंबेगाव-1,86,130
- खेड-आळंदी 1,75,022
- शिरुर-1,79,566
- भोसरी-1,77,113
- हडपसर-1,89,829
2019 विधानसभानिहाय मतदान आकडेवारी
- जुन्नर-1,93,965
- आंबेगाव-1,97,052
- खेड-आळंदी-2,02,740
- शिरुर-2,27,542
- भोसरी-2,37,767
- हडपसर-2,33,316
विधानसभा मतदारसंघ 2019 मधील मतदान%
- शिरुर -52%
- आंबेगाव-47%
- जुन्नर-90%
- खेड-आळंदी -76%
- भोसरी-70%
- हडपसर-84%
- एकूण मतदार संख्या -21,73,,448
2019 मधील शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण 21 लाख 20 हजार 988 मतदारांपैकी 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात एक ते दीड टक्यांनी घट झाली आहे. भोसरी विधानसभा आणि हसपसर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं.
गेल्या पंधरा वर्षांपासून तीच आश्वासने पूर्ण न झाल्याने शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदारांची नाराजी पाहिला मिळली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि जातीचे राजकारण, तर गेल्या पंधरा वर्षांपासूनचा खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आणि मतदारसंघाची इतंभूत माहिती, राजकारणाचा दीर्घ अनुभव आणि गेल्या 20 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.
कोणाकोणाच्या सभा?
शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने यावेळी शिवसेना भाजप महायुतीकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राज्यमंत्री विजय शिवतारे,शिवसेना चित्रपट सेना उपाध्यक्ष सुबोध भावे तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीकडून माजी कृषीमंत्री शरद पवार,माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,छगन भुजबळ,राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील आदींच्या सभा शिरुर लोकसभा मतदारसंघात झाल्या.
प्रचाराचे मुद्दे
शिरुर लोकसभा क्षेत्रामधील पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर या महामार्गावरील वाहतूक कोंडी, विमानतळ प्राधिकरण यांच्या आहावालाने खेड तालुक्यातील बहुचर्चित असे खेडचे विमानतळ गेल्याने, हा सुद्धा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला बैलगडा शर्यत बंदी या आणि अशा अनेक मुद्द्यांनी यंदा प्रजार गाजला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्याची आस्था असलेला बैलगाडा बंदी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. तो मुद्दा मीच सोडवणार असे आश्वासन त्यांनी दिले आहे.