Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चार मतदारसंघांनी आढळराव पाटलांचा घात केला, अमोल कोल्हेंना जिंकून दिलं

पुणे : शिवसेना-भाजप युतीने राज्यात घवघवीत यश मिळवलं असलं तरी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळवलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा 58,483 मतांनी पराभव केला. आढळराव […]

या चार मतदारसंघांनी आढळराव पाटलांचा घात केला, अमोल कोल्हेंना जिंकून दिलं
Follow us
| Updated on: May 24, 2019 | 8:26 PM

पुणे : शिवसेना-भाजप युतीने राज्यात घवघवीत यश मिळवलं असलं तरी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळवलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा 58,483 मतांनी पराभव केला. आढळराव पाटील निवडून आले असते तर केंद्रीय मंत्री मंडळामध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली असती. परंतु कोल्हे यांनी केलेल्या पराभवाने ही मंत्री पदाची संधीही हुकली आहे.

राज्यासह देशभर पुन्हा एकदा मोदी लाट आली असताना आणि शिवसेनेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून यंदा आढळराव पाटील यांना नक्कीच संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र, ज्याप्रमाणे मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन देशभरात झाले. तसेच तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना निवडून देणार आहात, असा प्रचार शिवसेनेकडून झाला नाही. शिवसेनेची निर्णय घेण्याची पद्धत लक्षात घेऊन आढळराव पाटील यांनीही तसा प्रचार केला नाही. तसेच गेल्या 15 वर्षांपासून तोच चेहरा असल्याने त्यांच्या विरोधात मतदारांमध्ये नाराजी होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकेमुळे घराघरात पोहोचण्यास कोल्हे यांना मतदारापर्यंत पोहचणे सोपे गेले आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यांनी मतदारांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अमोल कोल्हे यांचा नवीन असा चेहरा समोर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात बदल घडला.

कोणकोणत्या मतदारसंघात आढळराव पाटलांना कमी मते?

आढळराव पाटील यांना स्वतःचा तालुका म्हणजे आंबेगाव तालुक्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना 25697 मतांची आघाडी मिळाली. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना 107781 इतकी मते मिळाली, तर आढळराव पाटील यांना 82084 इतकी मते मिळाली. एकंदरीत पाहता होम पिचवर आढळराव हे पिछाडीवर होते.

मागील निवडणुकीत खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात 61661 हजारांची आघाडी दिली होती. मात्र या वेळी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाने 7446 मतांची आघाडी अमोल कोल्हे यांनी मिळाली.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक उमेदवार असलेले अमोल कोल्हे यांना या मतदारसंघात सुमारे 41551 इतक्या मतांची आघाडी मिळाली. तर आढळराव पाटील यांना मतदारसंघात पिछाडी मिळाल्याने घात झाला. याच लोकसभेमधील शिरूर विधानसभा क्षेत्रात देखील शिवाजी आढळराव पाटील हे पिछाडीवर होते, तर अमोल कोल्हे हे 26305 मतांनी आघाडीवर होते.

या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून फक्त शहरी भागातील भोसरी विधानसभा क्षेत्रात अमोल कोल्हे हे 37077 इतक्या मताने पिछाडी वर होते. तर हडपसर विधनासभा क्षेत्राने आढळराव पाटील यांना 5370 मतांची आघाडी दिली. एकंदरीत पाहता सहा विधानसभा क्षेत्रांपैकी चार विधानसभा क्षेत्रांनी आढळराव पाटील यांचा घात केला. तर भोसरी आणि हडपसर विधानसभा क्षेत्राने तारलं होतं. परंतु भोसरी, हडपसर शेवटच्या क्षणापर्यंत जुन्नर, आंबेगाब आणि शिरुर तालुक्याची आघाडी तोडू शकले नाही. यामुळेच आढळराव पाटील यांचा पराभव झाला.

उमेदवारांना मिळालेली मते

शिवाजीराव आढळराव पाटील

जुन्नर-71631

आंबेगाव-82084

खेड-92137

शिरूर-93732

भोसरी-125336

हडपसर-111082

टपाली मतदान -1345

एकूण 577347

अमोल कोल्हे

जुन्नर-113182

आंबेगाव-107781

खेड-99583

शिरूर-120037

भोसरी-88259

हडपसर-105712

टपाली मतदान-1276

एकूण-635830

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.