दसरा मेळाव्यावरून शिवसेना आक्रमक, मुंबईत ‘या’ कार्यालयावर धडकले शिष्टमंडळ

शिवसेनेने महापालिकेकडे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी अद्याप दोन वेळा अर्ज केला आहे. तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेटही घेतली आहे. मात्र परवानगी मिळालेली नाही.

दसरा मेळाव्यावरून शिवसेना आक्रमक, मुंबईत 'या' कार्यालयावर धडकले शिष्टमंडळ
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 5:17 PM

विनायक डावरुंग, मुंबईः शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) परवानगीवरून शिवसेना आक्रमक झालेली आज पहायला मिळाली. महापालिकेच्या जी नॉर्थ विभागात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतली. या मेळाव्यासाठी शिवसेनेकडून २२ ऑगस्ट रोजीच अर्ज करण्यात आला होता. मात्र अद्याप विधी विभागाकडून कोणताही निर्णय आलेला नाही, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. शिवसेना नेते मिलिंद वैद्य (Milind Vaidya ) यांनी ही माहिती दिली. शिवाजीपार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा कोण घेणार, यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात वाद रंगला आहे. आम्हीच मूळ शिवसेना असल्याने आम्हीच इथे दसरा मेळावा घेणार, अशी भूमिका शिंदे गटाची होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठिशी अजूनही असंख्य शिवसैनिक आहेत, हा संदेश उद्धव ठाकरेंना द्यायचा आहे. महापालिकेने अद्याप कुणालाही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही.

काय म्हणाले मिलिंद वैद्य?

१६ तारखेला विधी खात्याकडे वॉर्डने परवानगीबाबत संपर्क साधलेला आहे. मात्र विधी खात्याकडून आजपर्यंत कोणताही निर्णय जाला नाही. त्यामुळे दसऱ्याच्या परवानगीवर अद्याप निर्णय झालेला नाही. पण परवानगी मिळो अथवा न मिळो, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये उपस्थित राहणार, आणि मेळाव्यासाठी एकत्र जमणार, असं वक्तव्य मिलिंद वैद्य यांनी केलंय.

शिंदे गटाची तयारी बीकेसीवर?

दरम्यान, शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानाकरिता अर्ज दाखल केला होता. याला महापालिकेकडून परवानगीही देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेच्या मेळाव्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

शिवसेनेच्या अर्जावर काय निर्णय?

शिवसेनेने महापालिकेकडे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी अद्याप दोन वेळा अर्ज केला आहे. तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेटही घेतली आहे. मात्र परवानगी मिळालेली नाही. शिवसेनेचा अर्ज विधी विभागाकडे पाठवला असं पालिकेने म्हटलंय. मात्र विधी विभागाकडून अद्याप परवानगी आलेली नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तरीही शिवसैनिक शिवाजी पार्कवर एकत्रित येऊन तिथेच दसरा मेळावा घेतला जाईल, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.