Rajya Sabha Election : संजय राऊतांच्या बडबडीला शिवसैनिकचं वैतागलेत, सत्तेचा माज आलाय, अनिल बोंडे नेमकं काय म्हणालेत…

जे राज्यसभेत झालं ते विधान परिषदेत होणार, अशी ग्वाही अनिल बोंडे यांनी दिली. अपक्ष आमदार घोडेबाजारात खपले असा आरोप संजय राऊतांनी केलाय. त्यामुळं अपक्ष आमदारही बदनाम झालेत. अशाप्रकारचा गाढवपणा कोणी करणार नाही.

Rajya Sabha Election : संजय राऊतांच्या बडबडीला शिवसैनिकचं वैतागलेत, सत्तेचा माज आलाय, अनिल बोंडे नेमकं काय म्हणालेत...
खासदार अनिल बोंडे
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 12:19 PM

नागपूर : राज्यसभेत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. भाजपाचे धनंजय महाडीक ( Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला. यामुळं राज्यातील जनता खूश आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला जनताच नव्हे, तर आमदार वैतागले आहेत. आमदार म्हणतात, आमच्याकडून मंत्री कमिशन घेतात. मंत्री, आमदारांना मुख्यमंत्री भेटत नाही. यांच्या सावळा गोंधळामुळं सर्वांना आठवण फडणवीस यांच्या काळाचीच येत आहे, असं मत अनिल बोंडे यांनी नागपुरात व्यक्त केलं. राज्यातली जनता म्हणते पुन्हा देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री पाहिजे. संजय राऊतांचं बोलणं थांबविलं नाही तर पूर्ण शिवसेना लंबी होऊन जाईल, अशी कुजबूज शिवसेनेत सुरू आहे. संजय राऊत यांच्याकडंही यंत्रणा आहे. त्यांनी त्या यंत्रणेचा दुरुपयोग केला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आतमध्ये टाकलं. त्यांना कैदेत टाकायला कोर्टानं नाकारलं. रिपब्लिक टीव्हीच्या संपादकांना आतमध्ये टाकलं. तेव्हाही कोर्टानं नाकारलं. बदल्याच्या भावनेनं संजय राऊत पेटलेले आहेत. सत्ता लोकांसाठी असते. पण, दुर्दैवानं यांना सत्तेचा माज आलाय, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.

पाहा व्हिडीओ काय म्हणाले, अनिल बोंडे…

अपक्षांना बदनाम करणारे संजय राऊत

राज्यसभेवर निवडून आल्यानंतर ते नागपुरात पहिल्यांदा आले. त्यावेळी बोलत होते. जे राज्यसभेत झालं ते विधान परिषदेत होणार, अशी ग्वाही अनिल बोंडे यांनी दिली. अपक्ष आमदार घोडेबाजारात खपले असा आरोप संजय राऊतांनी केलाय. त्यामुळं अपक्ष आमदारही बदनाम झालेत. अशाप्रकारचा गाढवपणा कोणी करणार नाही. तीन लाख लोकांनी निवडून दिलेला अपक्ष आमदार हा पैशानी खपतो. असं वारंवार संजय राऊत सांगतात. हा लोकप्रतिनिधींचा मोठा अपमान आहे. त्यामुळं आता अपक्षही सद्सद् विवेकबुद्धीला जागतील.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडे मोठ्या नेत्या

कुणी मतदार केलं कुणी केलं नाही. यासाठी पुरावे मिळेपर्यंत कुणाचाही अपमान करू नये. आमदारांचा अपमान करण्याचा गाढवपणा संजय राऊतच करू शकतात. भाजपत सर्वांना न्याय दिला जातो. छत्रपती संभाजी राजेंचा अपमान शिवसेनेनंच केला आहे. आम्ही एका मावळ्याला खासदार भाजपनं बनविलं, असंही अनिल बोंडे म्हणाले. दरम्यान, पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. आणखी त्या मोठ्या होतील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.