Mumabai : विक्रोळीतील शिवसैनिक थेट मातोश्रीवर, नेमके कारण काय? घोषणाबाजीने परिसर दुमदुमला

विक्रोळीचा भाग हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच भागात शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात भगदाड पाडण्याचा प्रयत्न हा शिंदे गटाकडून केला जात आहे.

Mumabai : विक्रोळीतील शिवसैनिक थेट मातोश्रीवर, नेमके कारण काय? घोषणाबाजीने परिसर दुमदुमला
वरळीतील शिवसैनिक मातोश्रीवर दाखल
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 9:33 PM

सुनिल जाधव Tv9 मराठी प्रतिनिधी मुंबई : शिंदे गटात हे इनकमिंग हे सुरुच आहे. सत्ता स्थापन होऊन तीन महिने झाले असे असताना शिवसेनेतील आमदार, खासदार यांनीच नव्हे तर आता पदाधिकारी देखील शिंदे गटात (Eknath Shinde) दाखल होत आहेत. रविवारी विक्रोळीतील काही शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर वेगळाच ड्रामा पाहवयास मिळाला. काही शिवसैनिकांच्या (Shivsainik) प्रवेशामुळे शिवसेना पक्षाला काही फरक पडणार नाही हे दाखवून देण्यासाठी विक्रोळीतील काही शिवसैनिक हे मातोश्रीवर (Matoshri) दाखल झाले होते. त्यामुळे शिंदे गटात इनकमिंग सुरु असले तरी कट्टर शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

विक्रोळीचा भाग हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच भागात शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात भगदाड पाडण्याचा प्रयत्न हा शिंदे गटाकडून केला जात आहे. हे सर्व होत असतानाच रविवारी दुपारी काही शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

विक्रोळीतील काही शिवसैनिकांच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाचे वर्चस्व निर्माण होणार का अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. यापूर्वीही शिंदे गटात अनेक शिवसैनिकांचे प्रवेश झाले आहेत. पण विक्रोळीतील शिवसैनिकांच्या प्रवेशानंतर वेगळेच काही दर्शवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न होता.

शिंदे गटात काही शिवसैनिकांच्या प्रवेशानंतरही विक्रोळीत शिवसेनेला काही फरक पडणार नाही हे दाखवून देण्यासाठी याच भागातील काही शिवसैनिक हे मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी महिला शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शिवसैनिक हे मातोश्री येथे दाखल होताच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर येऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी केली. शिंदे गटात काहींनी प्रवेश केल्याचा परिणाम पक्षावर होणार नसल्याचे हे दाखवून देण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.