Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde vs Uddhav thackeray : ठाकरेंना शिवसैनिकांचा धक्का, केसरकर, सरवणकर, आशिष जैस्वाल गुवाहाटीत दाखल, ठा

ठाकरेंना शिवसैनिकांचा धक्का

Eknath Shinde vs Uddhav thackeray : ठाकरेंना शिवसैनिकांचा धक्का, केसरकर, सरवणकर, आशिष जैस्वाल गुवाहाटीत दाखल, ठा
दीपक केसरकर
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 10:57 AM

मुंबई :  दीपक केसरकर, आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal), मंगेश कुडाळकर आणि सदा सवरणकर हे चारही आमदार गुवाहाटीमधील एकनाथ शिंदे थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहचले आहेत सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 41 आमदार आणि सहा अपक्ष असे एकूण 47 आमदार असल्याचं बोललं जातंय. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. आशिष जैस्वाल हे शिवसेना पक्षप्रमुख यांचे निकटवर्तीय समजले जातात. कालपासून आशिष जैस्वाल हे नॉट रिचेबल होते. अखेर ते गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे दीपक केसरकरही शिंदे गटात सामील झाले आहेत. आशिष जेस्वाल यांना मिळून एकूण तीन आमदार गुवाहाटीत दाखल झालेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं शिवसेनेसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. आपल्यासोबत असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना (Shivsena) आहे, असा दावा आता एकनाथ शिंदे करण्याची शक्यता आहे. चार आमदार वाढल्यानं आता एकनाथ शिंदे यांना मिळणारा शिवसेना आमदारांचा पाठिंबाही वाढलाय.

नव्याने कोण सामील झाले?

  1. दीपक केसरकर
  2. आशिष जैस्वाल
  3. हे सुद्धा वाचा
  4. मंगेश कुडाळकर
  5. सदा सवरणकर

थोडक्यात पण महत्त्वाचं

  1. शिंदे यांच्यासोबत 41 आमदार
  2. अपक्ष 6 आमदारांचाही शिंदे यांना पाठिंबा
  3. शिवसेना फोडण्यात यश आल्याचं समोर
  4. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडावी, ही शिंदे गटाची प्रमुख मागणी

कोण कोण आलं?

आशिष जैस्वाल यांच्यासह मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर या सर्व आमदारांसह गुवाहाटी इथं पोहोचलेले आहेत. सकाळी साडे नऊ वाजता ते गुवाहाटी विमानतळावर दाखल झाले. हे सर्व आमदार गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशिष जैस्वाल गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. काँग्रेसने नेते टक्केमारी मागत असल्याचा कारणाचा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र या आरोपांवर कोणतीही कारवाई न झाल्यानं ते नाराज असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आता आशिष जैस्वाल हे गुवाहाटीत दाखल झालेत. शिवाय आपल्यासह आणखी तिघा आमदारांनाही आणलंय.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.