Shivsena : शिवबंधन नंतर आता प्रतिज्ञापत्र, गळती रोखण्यासाठी शिवसेनेचा काय आहे फंडा?
एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांनी केलेल्या बंडामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. बंड तर झालेच पण आता शिंदे गटाकडून थेट पक्षावरही आपलाच हक्क सांगितला जात आहे. यामुळे भविष्यात अशा संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावू नये म्हणून हा काळजी घेतली जात आहे.
मुंबई : शिवसैनिक हे (Shivsena) शिवसेनेशी किती एकनिष्ठ आहेत हे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने होत असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेली गळती खुद्द पक्ष प्रमुख यांना देखील रोखता आलेली नाही. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या बरोबर एक नाही दोन नाही तर 39 आमदारांनी बंड केले आहे. एवढेच नाहीतर आता खासदारही शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता पक्षाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. आतापर्यंत शिवबंधन बांधले जात होते पण यानंतर शिवसैनिकांना एकनिष्ठतेचे (Declaration) प्रतिज्ञापत्रच द्यावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असल्याचे ते प्रतिज्ञापत्र असणार आहे. बंडखोरांच्या भूमिकेवरुन आता असे बदल पक्षामध्ये केले जात आहेत. शिवबंधन नंतर आता चर्चा आहे ती प्रतिज्ञापत्राची
काय असणार आहे प्रतिज्ञा पत्रामध्ये?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. असा मजकूर या पत्रावर असणार आहे. त्यामुळे कोणी पक्ष सोडला तरी त्यापेक्षा वेगळा काही रोल घेऊ नये म्हणून ही काळजी पक्षाकडून घेतली जात आहे. आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुखांना अशाप्रकारचे पत्र द्यावे लागणार आहे. भविष्यात कोणी पक्षाबाबत वेगळा असा दावा करु नये शिवाय शिवसैनिकांची वज्रमूठ कायम आहे हे दाखवून देण्यासाठी हा फंडा राबवला जात आहे.
शिवसेनेकडून सावध पवित्रा
एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांनी केलेल्या बंडामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. बंड तर झालेच पण आता शिंदे गटाकडून थेट पक्षावरही आपलाच हक्क सांगितला जात आहे. यामुळे भविष्यात अशा संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावू नये म्हणून हा काळजी घेतली जात आहे. यापूर्वी शिवबंधनाचे बंधन होते. असे असतानाही अनेकांनी पक्ष सोडला पण आता प्रतिज्ञापत्रामुळे विचार करुन बाहेर पडावे लागेल यामुळेच ही नियमावली जारी करण्यात आली आहे.
पक्षाकडून प्रतिज्ञापत्राची मागणी
आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत शिवाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे हे प्रतिज्ञापत्र असणार आहे. हा केवळ घोषणाच नाहीतर प्रतिज्ञापत्र घेण्यासही सुरवातही करण्यात आली आहे. यामध्ये पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख यांना हे द्यावे लागणार आहे. पक्षाला एका नियमावलीत आणण्यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहेत.