शिवसेना ED विरोधात आक्रमक, 5 जानेवारीला शक्ती प्रदर्शनाची शक्यता

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ED कडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना ED विरोधात आक्रमक, 5 जानेवारीला शक्ती प्रदर्शनाची शक्यता
उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 8:32 AM

मुंबई: प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (ShivSena activists likely to take aggressive stance against ED)

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ED कडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळतेय. गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना ED कडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे शिवसेनेनं आता ED विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते. हे संपूर्ण प्रकरण HDILशी संबंधित आहे. HDILच्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक केली होत. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होतं. पण पुढे या प्रकरणाचा तपास EDकडे सोपवण्यात आला. वाधवान बंधूंचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. प्रवीण हे संजय राऊत यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेत. मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका पुनर्विकास प्रकल्पाचं काम HDIL कडून करण्यात येत होतं. त्यात अनियमितता समोर आल्यानंतर वाधवान बंधूंना अटक करण्यात आली.

प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकांऊटमधून पैसे ट्रान्सफर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. त्यासाठीच ED कडून वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

बायकांच्या पदराआडून लढाई का? संजय राऊतांचे 10 मोठे हल्ले

ShivSena activists likely to take aggressive stance against ED

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.