LIVE: युती झाली, लोकसभेसाठी शिवसेना 23, भाजप 25, विधानसभा 50-50
मुंबई: शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करत भाजपसोबत युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजपची युती जाहीर केली. या पत्रकार परिषदेत “आगामी निवडणुकांसाठी फॉर्म्युलेही जाहीर करण्यात आले. शिवसेना-भाजप आगामी सर्व निवडणुका एकत्र लढेल. लोकसभा निवडुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेना 23 तर भाजप 25 […]
मुंबई: शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करत भाजपसोबत युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजपची युती जाहीर केली. या पत्रकार परिषदेत “आगामी निवडणुकांसाठी फॉर्म्युलेही जाहीर करण्यात आले. शिवसेना-भाजप आगामी सर्व निवडणुका एकत्र लढेल. लोकसभा निवडुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढेल. तर विधानसभेसाठी मित्रपक्षांशी चर्चा करुन जागा निश्चित केल्या जातील, ज्या जागा उरतील त्या दोन्ही पक्ष म्हणजेच शिवसेना-भाजप 50-50 टक्के जागा लढतील”, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
वरळीतील ब्लू सी या हॉटेलमध्ये शिवसेना-भाजपची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीवर भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेसाठी वरळीतील हॉटेलवर आले. या पत्रकार परिषदेला शिवसेना-भाजपचे सर्व दिग्गज नेते, कॅबिनेट मंत्रिमंडळ उपस्थित होतं.
युतीबाबत तीन महत्त्वाचे मुद्दे
- लोकसभा निवडणुकीतील जागा – शिवसेना 23 जागा, भाजप – 25 जागा लढणार
- विधानसभा – दोन्ही पक्ष अर्ध्या अर्ध्या जागा लढवणार
- शिवसेनेची नाणारची मागणी मान्य, नाणार प्रकल्प हलवणार
वाचा: युतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेच्या या तीन अटी भाजपकडून मान्य
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
विविध मुद्द्यांवर एकमत झाल्यामुळे आपण युतीसाठी एकत्रित आलो असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शेतकरी कर्जमाफीसंबंधी प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी लाभापासून वंचित असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय रिफायनरी प्रकल्प आणि इतर मागण्यांबाबतही शिवसेना-भाजपात एकमत झालं आहे. आपण गेली 50 वर्ष ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांनाच आपल्या भांडणाचा फायदा होऊ नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित शाह काय म्हणाले?
कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या मनातली भावना पूर्ण झाली असल्याचं सांगत अमित शाहांनी युतीचं स्वागत केलं. महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभेनंतर महाराष्ट्र विधानसभेसाठीही चार महिन्यात निवडणूक आहे. त्यामुळे जबाबदारी आणि जागाही निम्म्या वाटून घेणार असल्याचं अमित शाहांनी जाहीर केलं.
दुपारी सव्वाचारच्या सुमारास अमित शाह मुंबईत दाखल झाले. उद्धव ठाकरेंना भेटण्यापूर्वी अमित शाह भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. दुसरीकडे शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव, आदित्य आणि अमित शाह -मुख्यमंत्री फडणवीस हे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेला रवाना झाले.
2014 मध्ये कोण किती जागा लढलं?
2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने 48 जागांपैकी 42 जागा जिंकल्या होत्या. 2014 ला भाजपने काही जागा मित्रपक्षांनाही सोडल्या होत्या. पण यावेळी ही युती फक्त शिवसेना आणि भाजप यांचीच आहे.
2014 मध्ये शिवसेना 20 जागा लढली होती, त्यापैकी 18 जागा जिंकल्या. तर भाजपने 24 जागा लढवून 23 जागा जिंकल्या होत्या.
वाचा: सध्या कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार?
LIVE UPDATE
पत्रकार परिषद
मुख्यमंत्री –
शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढेल, भजापच्या वाट्याला 25 जागा
विधानसभेबाबत मित्रपक्षांशी चर्चा करु, त्यानंतर उरतील त्या जागा शिवसेना-भाजप अर्ध्या अर्ध्या लढेल
आम्ही राज्यामध्ये युतीचं सरकार एकत्र चालवत आहोत. राष्ट्रीय हितासाठी पक्ष एकत्र यायला पाहिजेत.
विधानसभा, लोकसभासह सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला.
आमच्या काही विषयावर मतभेद, परंतु विचार एक आहे.
शेतक-यांना कर्जमाफी दिली. काही शेतक-यांना तांत्रिक बाबीमुळे कर्जमाफी मिळाली नाही, या संदर्भात त्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी पुन्हा प्रयत्न केला जाईल. पीकविम्याचा प्रश्न मार्गी लावणार
राम मंदिरासाठी दोन्ही पक्ष आग्रही
काही जणांना आमची युती नको वाटत होती, मात्र आम्ही 25 वर्षांपासून एकत्र
संपूर्ण पत्रकार परिषद VIDEO:
Maharashtra Chief Minister announces an alliance between Shiv Sena and BJP for both Lok Sabha and state assembly elections pic.twitter.com/YOlhGtIddu
— ANI (@ANI) February 18, 2019
युतीबाबत दिवसभरात काय झालं?
दुपारी सव्वाचार वाजता भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबई विमानतळावर दाखल झाले. तिथे भाजप नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजनांसह कार्यकर्त्यांनी अमित शाहांचं स्वागत केलं.
यांनतर अमित शाहांसह सर्व नेते वांद्र्यातील सोफिटल हॉटेलवर गेले. इथे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत अमित शाहांनी बैठक घेतली. जवळपास दोन तास ही बैठक चालली.
त्याच दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी येथील ब्लू सी हॉटेलवर जाऊन पाहणी केली. याच हॉटेलवर उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची पत्रकार परिषद आयोजित होती.
एकीकडे भाजपची बैठक सुरु होती, तर दुसरीकडे मातोश्रीवर शिवसेना नेत्यांचीही खलबतं सुरु होती. शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, गजानन कीर्तीकर यांच्यासह दिग्गज नेते मातोश्रीवर हजर होते
अमित शाह यांनी जवळपास दोन तास चर्चा केल्यानंतर साडेसहाच्या सुमारास ते मातोश्रीवर दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाहांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांशी तासभर चर्चा केली
उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यातील बैठक साडेसात वाजता संपली, जवळपास 50 मिनिटे ‘मातोश्री’वर खलबतं चालली
संध्याकाळी 7.35 मिनिटांनी मुख्यमंत्री, अमित शाह, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले
संध्याकाळी 7.50 च्या सुमारास वरळीतील ब्लू सी या हॉटेलवर शिवसेना-भाजपच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली.
शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढेल, भजापच्या वाट्याला 25 जागा, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
विधानसभेबाबत मित्रपक्षांशी चर्चा करु, त्यानंतर उरतील त्या जागा शिवसेना-भाजप अर्ध्या अर्ध्या लढेल
LIVE UPDATE
- शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढेल, भजापच्या वाट्याला 25 जागा, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
- जवळपास 50 मिनिटांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री, अमित शाह, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेसाठी रवाना
- उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यातील बैठक साडेसात वाजता संपली, जवळपास 50 मिनिटे ‘मातोश्री’वर खलबतं चालली
- अमित शाह मातोश्रीवर दाखल
- अमित शाह सोफिटल हॉटेलमध्ये दाखल, भाजप नेत्यांसोबत बैठक
- मनोहर जोशी, संजय राऊत मातेश्रीवर दाखल.
- उद्धव ठाकरेंना भेटण्यापूर्वी अमित शाह भाजप नेत्यांसोबत बैठक घेणार, या बैठकीला अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार
- अमित शाह मुंबईत दाखल
- अमित शाह थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार
युतीसाठी शिवसेनेच्या अटी काय आहेत?
1) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदार संघ देणार. त्यामुळे महाराष्ट्रातील 48 पैकी शिवसेना 23 तर भाजप 25 जागांवर उमेदवार उभे करणार.
2) विधानसभा निवडणुकीत 288 पैकी शिवसेना 144 आणि भाजप 144 असा फिफ्टी-फिफ्टी फाॅर्मुला असेल.
3) शिवसेनेनं ही युती फक्त भाजपशी केलेली आहे. भाजपच्या मित्रपक्षांशी नाही.
4) त्यामुळे भाजपच्या 144 जागांपैकी त्यांना मित्र पक्षांसाठी किमान 20 जागा सोडाव्या लागतील.
5) भाजपच्या मित्र पक्षांच्या जागेवर शिवसेना त्यांचे उमेदवार उभे करणार.
6) त्यामुळे विधानसभेत शिवसेना 164 पर्यंत उमेदवार उभे करु शकते.
7) युतीतील जागावाटपांबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही शिवसेनेनं आग्रही भूमिका ठेवली आहे. युती करताना ही प्रमुख अट ही ठेवण्यात आली होती.
8) शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्ती, त्यांच्या उत्पादित पीकांना हमीभाव आणि दुष्काळग्रस्त गावांत तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.