नवी दिल्ली : “भाजपला तीन वर्षे तर शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी संजय राऊत तयार आहेत,” असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला (Ramdas athawale on shiv sena bjp new formula) आहे. तसेच याबाबत लवकरच भाजपची चर्चा करुन पुन्हा शिवसेना नेत्यांशी संपर्क साधणार असल्याचेही आठवले (Ramdas athawale on shiv sena bjp new formula) म्हणाले. यामुळे शिवेसना भाजप युती पुन्हा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले (Ramdas athawale on shiv sena bjp new formula) आहे.
“मी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षावर चर्चा झाली. मी त्यांना तीन वर्ष भाजपचा मुख्यमंत्री आणि दोन वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला सांगितला. यावरुन भाजप महाराष्ट्रात जर हा फॉर्म्युला मान्य करण्यास तयार असेल, तर शिवसेना यावर विचार करेल,” असं रामदास आठवले म्हणाले. याबाबत मी लवकरच भाजपशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
Union Minister Ramdas Athawale: I had talked to Sanjay Raut ji about a compromise. I suggested him a formula of 3 years (CM from BJP) and 2 years (CM from Shiv Sena) to which he said that if BJP agrees then Shiv Sena can think about it. I will discuss this with BJP. pic.twitter.com/VRn7AiVgHF
— ANI (@ANI) November 18, 2019
शिवसेना भाजपमध्ये अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन फूट पडली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर तीन आठवडे उलटूनही सत्तासंघर्ष कायम आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी ‘आम्ही राज्यातील राजकारणाविषयी चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबद्दल त्यांना माहिती दिली. इतर कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही सध्या राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर नजर ठेवणार पुढे पावलं काय असणार हे ठरणार’, असं शरद पवार (Ramdas athawale on shiv sena bjp new formula) म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं यासह इतर मित्रपक्षांसह महायुतीला जनतेने भरघोस जनादेश दिला. मात्र, भाजपने सत्तास्थापनेस नकार दिला. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत केवळ 56 जागा जिंकल्या होत्या. अपक्ष आमदारांनी दिलेल्या पाठिंब्यासह शिवसेनेचं संख्याबळ 64 वर पोहचलं. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 चा आकडा गाठणं आवश्यक आहे. त्यामुळे आणखी 81 आमदारांची जुळवाजुळव शिवसेनेला करावी लागणार आहे.