Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हितेंद्र ठाकूर यांना शिवसेनेच्या विजय पाटील यांचं कडवं अव्हान

विरार, वसई, नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर (Shiv sena challenge to hitendra thakur) यांच्या बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे.

हितेंद्र ठाकूर यांना शिवसेनेच्या विजय पाटील यांचं कडवं अव्हान
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 12:54 PM

वसई : विरार, वसई, नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर (Shiv sena challenge to hitendra thakur) यांच्या बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे. वसई विधानसभेत 1990 पासून हितेंद्र ठाकूर 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत ठाकुरांना शह देण्यासाठी वसईतील भूमिपुत्र आणि व्यावसायिक विजय पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन हितेंद्र ठाकूर यांना कडवं आव्हान (Shiv sena challenge to hitendra thakur) उभं केलं आहे.

शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांनी काल (2 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्जही विकत घेतला असून ते 4 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच विजय पाटील यांनी कांग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस वसईची जागा सोडणार नसल्याने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

गेल्या 25 वर्षात हितेंद्र ठाकूर यांचे 3 आमदार, वसई विरार महापालिका त्यांच्या ताब्यात असतानाही त्यांनी येथील विकास केला नाही. आजही वसई पाण्याखाली डुबते, महापालिकेत भ्रष्टाचार, जनतेचे मुलभूत प्रश्न प्रलंबित असल्याने येथील जनता त्रस्त आहे. त्यांना आता बदल हवा आहे. त्यामुळे मला शिवसेनेने एबी फॉर्म देताच वसईकरांनी फोन आणि एसएमएस करुन अभिनंदन केले, असं विजय पाटील म्हणाले.

वसई ही सर्वधर्म प्रांताची आहे आणि येथील जनतेला बदल अपेक्षित असल्याने प्रत्येकजण राजकारण विरहित माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे राहत आहेत. 30 वर्षानंतर या निवडणुकीत पहिल्यांदा भगवा फडकणार, असा आशावाद वसई विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी वसईचे चिमाजी आप्पा मैदान, पार नाका, झेंडा बाजार वसई तहसीलपर्यंत रॅली काढून वसईच्या प्रांत कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात महिला, पुरुष, तरुण, जेष्ठ नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.