बाळासाहेबांचं स्वप्न साकार, उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अंबाबाईच्या दर्शनाला
उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूरकडे रवाना झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी रवाना झाले.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सेनेच्या 18 खासदारांसह कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे आपल्या सर्व खासदारांसह जात आहेत. उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूरकडे रवाना झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी रवाना झाले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना-भाजप प्रचारसभेचा नारळ कोल्हापुरात फुटला होता. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा मानस दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. मात्र कोल्हापुरात नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळत होतं.
यंदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय मंडलिक तर हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने या दोन्ही शिवसेना उमेदवारांनी विजय मिळवला. त्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाल्याने उद्धव ठाकरे अंबाबाईच्या दर्शनाला जात आहेत.
आज बाळासाहेब हवे होते : चंद्रकांत पाटील
दरम्यान, कोल्हापुरात शिवसेनेचा भगवा फडकवणं हे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निकालादिवशी म्हणजेच 23 मे रोजी समाधान व्यक्त केलं होतं. शिवाय आज बाळासाहेब असायला हवे होते, असंही ते म्हणाले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले आणि कोल्हापूर हे दोन मतदारसंघ आहेत. हातकणंगलेमधून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी स्वाभिमानीच्या राजू शेट्टींचा पराभव केलाय. तर कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांवर शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी मात केली. या विजयानंतर कोल्हापुरात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.
संबंधित बातम्या
कोल्हापुरात भगवा फडकला, बाळासाहेब असायला हवे होते : चंद्रकांत पाटील
युतीची शोकांतिका! बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही ठेकेदार मिळेना
Kolhapur Lok sabha result 2019 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निकाल
उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडावी लागली, राणेंचा आत्मचरित्रात खुलासा