Eknath Shinde : भिवंडीत सकाळी आदित्य ठाकरे यांचा मेळावा, रात्री नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा; एकनाथ शिंदेंचं ट्विट

गुरुवारी सकाळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा भिवंडीमध्ये मेळावा पार पडला. मात्र त्यानंतर रात्रीच भिवंडीमधील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

Eknath Shinde : भिवंडीत सकाळी आदित्य ठाकरे यांचा मेळावा, रात्री नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा; एकनाथ शिंदेंचं ट्विट
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 7:08 AM

मुंबई : शिवेसेनेला (Shiv Sena) धक्क्यावर धक्के बसतच आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांना शिवसेनेतील आमदारांच्या एका मोठ्या गटाचा पाठिंबा मिळाला होता. या आमदारांच्या पाठिंब्यावरच एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि बहुमताची चाचणी जिंकली सुद्धा. दरम्यान एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता विविध शहरांच्या महापालिकेतील नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील होत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील जवळपास सर्वच माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर आता भिवंडीतही (Bhiwandi) शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भिवंडी महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शिंदे  गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

काय म्हटलं शिंदे यांनी?

याबाबत माहिती देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे. ‘ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दिला’ असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. भिवंडीमधील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिंदे गटात सामील झाल्याने भिवंडीमध्ये शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळी आदित्य ठाकरे  यांचा भिवंडीत मेळावा पार पडला होता. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. मात्र त्यानंतर गुरुवारी रात्रीच भिवंडीमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

हे सुद्धा वाचा

ठाणे, नवी मुंबईतही शिवसेनेला खिंडार

गुरुवारी भिवंडीमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. त्यापूर्वी ठाणे महापालिकेत एक माजी नगरसेवक सोडता सर्वच माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तीच स्थिती नवी मुंबईमध्ये देखील आहे. नवी मुंबईमधील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. कोकणामधील आजी, माजी नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होत असल्याने शिवसेनेला लागलेली ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.