शिवसेनेकडून 5 मंत्रिपदं, लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपप्रणित एनडीएच्या खासदारांची आज दिल्लीत बैठक होत आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी स्वत: फोन करुन निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे शिवसेनेला 5 मंत्रिपद मागणार आहेत, अशी माहिती […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपप्रणित एनडीएच्या खासदारांची आज दिल्लीत बैठक होत आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी स्वत: फोन करुन निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे शिवसेनेला 5 मंत्रिपद मागणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र भाजपकडून शिवसेनेला तीन मंत्रिपदांची ऑफर असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. शिवाय शिवसेनेकडून मंत्रिपदासह लोकसभा उपाध्यक्षपदही मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना ही मंत्रिपदं स्वीकारते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून राज्यसभा खासदार अनिल देसाई, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत आणि दक्षिण मध्य मुंबईतील खासदार राहुल शेवाळेंचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.
याशिवाय अरविंद सावंत, भावना गवळीही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
NDA मध्ये शिवसेना 18 जागांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे भाजप मित्रपक्षांतील महत्त्वाचा असलेल्या शिवसेनेला किती मंत्रिपदं देते ते पाहणे महत्त्वाचे आहे.
लोकसभा निकाल
दरम्यान, लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागी विजय मिळवला. काँग्रेसला अवघी 1 तर राष्ट्रवादीला नवनीत राणांसह 5 जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची जागा काबीज केली.
देशाचा निकाल
- भाजप + = 352
- काँग्रेस + = 87
- इतर + = 103
- एकूण = 542
महाराष्ट्राचा निकाल
- भाजप – 23
- शिवसेना- 18
- राष्ट्रवादी – 5
- काँग्रेस – 1
- वंचित आघाडी – 1
- एकूण – 48