मोठी बातमी! शिवेसनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर, मग निर्णय कधी? जाणून घ्या!
शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा फैसला लांबणीवर गेलाय. निवडणूक आयोगासमोर आज धनुष्यबाणाचा निर्णय होणार नाही.
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली : शिवसेनेच्या (Shiv Sena Latest News) धनुष्यबाणाचा (Dhanush Baan) फैसला लांबणीवर गेलाय. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central election Commission) आज धनुष्यबाणाचा निर्णय होणार नाही, अशी माहिती समोर आलीय. आज धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आजच घेतला जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होता. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार हा फैसला आज होणार नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हाबाबत पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदतही आज संपली आहे. शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकर घेतला जावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र हा फैसला पुन्हा लांबणीवर पडलाय.
शिवसेनेचे नेते दुपारी एक वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार आहे. त्यासाठी अनिल देसाई नवी दिल्लीत दाखल झाले. धनुष्यबाण हे चिन्हा शिवसेनेकडेच राहिल, असा विश्वास शिवसेनेच्या वतीने व्यक्त केला जातोय.
तर चिन्ह गोठवलं जाणार?
ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांकडून धनुष्यबाण चिन्हाकडून आग्रह धरला गेला, तर काय होणार? याबाबत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. दोन्ही गटाकडून आग्रह झाल्यास धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं.
मात्र त्याआधी कागदोपत्री पुरावे तपासले जातील, असंही ते म्हणाले. त्यानंतरतही निर्णय घेणं कठीण गेलं, तर तोंडी काही गोष्टींची विचारणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते, असंदेखील निकम यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना म्हटलंय.
धनुष्यबाण चिन्हाचा फैसला करण्याआधी बंडखोर आमदारांच्या अपात्रचे निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केली होती. पण शिंदे गटाच्या वकिलांनी या मागणीचा विरोध केला होता. निवडणूक आयोगाला आपलं काम करण्यासाठी परवानगी द्यावी, असं शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाल सांगितलं होतं.
सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली होती. मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानेच निवडणूक आयोगाला धनुष्यबाण चिन्हाबाबत कारावई करण्याचे आदेश दिले होते.
पोटनिवडणुकीचं काय?
अंधेरी निवडणुकीच्या पोटनिवडणुकीच्या आधी जर हा निर्णय झाला नाही, तर निवडणूक आयोगाला धनुष्यबाण हे चिन्हा गोठवावं लागणार आहे. दोन्ही गटाला एक तात्पुरतं चिन्ह दिलं जाऊ शकतं, असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय. अर्थात हे निवडणूक चिन्हा हे फक्त पोटनिवडणुकी पुरतंच मर्यादित असेल. त्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचा फैसला निवडणूक आयोगाला पुराव्यांची पडताळणी करुन घ्यावा लागेल, असंही ते म्हणाले.