काऊंटडाऊन सुरु, शिवसेनेचा भाजपला 48 तासांचा अल्टिमेटम

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती-आघाडी संदर्भात मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरु आहे. शिवसेनेने आता भाजपला 48 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. येत्या दोन दिवसात युतीचा निर्णय घ्या, असं शिवसेनेने भाजपला दर्डावल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची चर्चा रुळावर आली असली, तरी तिला अजून अंतिम स्वरुप मिळालेलं नाही. जागावाटपांच्या वाटाघाटीत दोन्ही पक्ष आपल्या भूमीकेवर ठाम असून […]

काऊंटडाऊन सुरु, शिवसेनेचा भाजपला 48 तासांचा अल्टिमेटम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती-आघाडी संदर्भात मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरु आहे. शिवसेनेने आता भाजपला 48 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. येत्या दोन दिवसात युतीचा निर्णय घ्या, असं शिवसेनेने भाजपला दर्डावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची चर्चा रुळावर आली असली, तरी तिला अजून अंतिम स्वरुप मिळालेलं नाही. जागावाटपांच्या वाटाघाटीत दोन्ही पक्ष आपल्या भूमीकेवर ठाम असून प्रत्येक जागेवर वारंवार घासाघीस होत आहे. त्यामुळे दिवस आणि वेळही वाया जात आहे. लोकसभेच्या उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी युतीची चर्चा फारशी न ताणता लवकरात लवकर संपवावी, जेणेकरून प्रचार मोहिमांचा धडाका सुरू करण्यात येईल. यासाठी शिवसेनेनं भाजपला दोन दिवसांची मुदत दिल्याची माहिती मिळत आहे.

पुढील 48 तासात युतीची चर्चा अंतिम स्वरुपात आली नाही तर, शिवसेना त्यांच्या उमेदवारांची प्रचार मोहिमा सुरु करणार आहे.

शिवसेनेच्या अटी मान्य करणं भाजपसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. शिवसेनेनं जागावाटपांचं केलेलं चक्रव्यूह भेदनं भाजपच्या चाणक्यांना कठीण जातं आहे. जागावाटपांत लोकसभेला प्राधान्य द्यावं तर महाराष्ट्र विधानसभांच्या जागा हातून निसटत आहेत. अशा कोंडीत सापडलेलं भाजप आता काय निर्णय घेतंय हे पहावं लागणार आहे.

तुमचा पंतप्रधान, आमचा मुख्यमंत्री, युतीसाठी शिवसेनेची अट

देशात भाजपचे पंतप्रधान हवे असतील तर, महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असला पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जागावाटपामध्ये शिवसेनेने 1995 चा फॉर्म्युला समोर ठेवला आहे. त्यानुसार शिवसेना 169 आणि भाजप 119 जागांचा हा फॉर्म्युला होता. शिवाय मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हवं आहे.

संबंधित बातम्या 

तुमचा पंतप्रधान, आमचा मुख्यमंत्री, युतीसाठी शिवसेनेची अट

भाजप-शिवसेना युतीसाठी थेट मोहन भागवतांची मध्यस्थी?  

शिवसेना-भाजप युतीचं घोडं ‘या’ दोन जागांवर अडलंय!   

शिवसेना-भाजप युती जवळपास निश्चित, ‘या’ एका जागेसाठी सेना अडून बसलीय!  

राऊत म्हणाले, शिवसेनाच मोठा भाऊ, दानवे म्हणतात….

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.