भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं: संजय राऊत

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवे घर थाटत असताना आम्हाला खूप दु:ख झाले होते. | Sanjay Raut

भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं: संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 11:23 AM

मुंबई: शिवसेना आणि भाजप राजकारणात 25 वर्षे एकत्र होते. त्यामुळे भाजपसोबत आमचा भावनिक बंध तयार झाला होता. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला भाजपशी नाते तोडावे लागले. हे नाते केवळ राजकीय नसून भावनिक होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवे घर थाटत असताना आम्हाला खूप दु:ख झाले होते, अशी भावना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलून दाखवली. (sanjay raut in shut up ya kunal interview)

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने काही दिवसांपूर्वीच ‘शट अप या कुणाल’ (Shut up Ya kunal) या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यामध्ये संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकारण, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि राष्ट्रीय राजकारण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या कटुतेविषयीही त्यांनी भाष्य केले.

आम्हाला भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला त्यासाठी काही कारणे आहेत. ही युती फक्त राजकीय नव्हे तर भावनिक होती. त्यामुळे ही युती तुटल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपविषयीचा रोषही भावनिक होता. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना कार्यकर्त्यांकडून “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” अशा घोषणा देऊन खिल्ली उडवण्यात आली होती.

कोणत्याही नेत्याचा अपमान होता कामा नये, हे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र, त्यावेळी शिवसैनिकांच्या भावना आणि वातावरण वेगळेच होते, असे संजय राऊत यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांना विश्वास बसत नव्हता. उद्धव ठाकरे खरंच मुख्यमंत्री झाले आहेत का, हे लोकांना खरे वाटत नव्हते. आपण स्वप्नात तर नाही आहोत ना हे तपासण्यासाठी लोक स्वत:लाच चिमटा काढून बघत होते, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील; राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

‘बाळासाहेबांनी मला 28 व्या वर्षी संपादक बनवलं, म्हणून….’ कुणाल कामराच्या ‘त्या’ प्रश्नावर संजय राऊतांचं भावनिक उत्तर

बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण

(sanjay raut in shut up ya kunal interview)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.